पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १६, १७. १६९ ह्मणाले-राज्ञि, तप, जप, यम, नियम इत्यादिकाच्या योगाने इतर सर्व सिद्धि प्राप्त होतात, पण अमरत्व प्राप्त होत नाही. शास्त्रात असा एकही उपाय सागितलेला नाही की, ज्याच्या योगाने उत्पन्न झालेली वस्त नाश पावणार नाही. शिवाय साकार वस्तु मृत्युमुखात पडणार नाही, असे होईल तरी कसे ? हे त्याचे निराशेचे उत्तर ऐकून खिन्न झालेल्या त्या राणीने दक्षिणादि देऊन ब्राह्मणाचे विसर्जन केले व आपल्या समजुतीप्रमाणेच पति-वियोगास भिणाऱ्या तिने असा विचार केला माझ्या या प्रिय पतीच्या डोळ्या देखतच जर मला मरण आले तर बरेच झाले. कारण मी परलोकी गेल्यावर मागे त्याचे काही जरी झाले तरी त्यामुळे मला तेथे दुख भोगावे लागणार नाही. कारण परलोकी गेल्यावर या जन्माचे स्मरण रहात नाही, असे शास्त्रात सागितले आहे व या जन्मी ज्याअर्थी आमास पूर्व जन्माचे व त्यातील आप्तजनाचे स्मरण नाहीं त्या अर्थी ते अगदी सत्य आहे, असेही स्वानुभवावरून ठरते. पण देव- वशात् असे न होता जर विपरीत प्रकार घडला ह्मणजे माझ्या देखत माझा पति परलोकी गेला तर त्याचा जीव या गृहातून बाहेर जाऊ नये, अशी काही युक्ति मी योजून ठेवीन. ह्मणजे तो या अतःपुरातच कोठे तरी असेल व मी सतत त्याच्या दृष्टीं पडेन. मला पाहिल्यावर त्याला अतिशय आनद होईल व त्याचा आनद तोच माझा आनद असल्यामुळे मीही सुखी होईन.असो; तर आता आजच या कृत्यास आरभ केला पाहिजे. जप, उप- वास व नियम याच्या योगाने मी अगोदर देवी सरस्वतीस प्रसन्न करून घेते, असा निश्चय करून ती श्रेष्ठ व साध्वी स्त्री पति कदाचित् अनु- मोदन देणार नाही या भीतीने त्याला न कळविताच व्रतास आरभ करिती झाली. हे व्रत पतीच्या हिताकरिताच तिने आरभिलें असल्यामुळे "पतीच्या आज्ञेवाचून व्रताचरणादि केल्यास स्त्री महा दोषी होते " या धर्मशास्त्रोक्त प्रत्यवायास ती पात्र होत नाही. कारण धर्मशास्त्रातच तसे स्पष्ट झटले आहे __ असो; तिने ते उग्र व्रत यथाशास्त्र चालविले. तिने आपला शुद्ध आचार व नियम याचे दृढ संकल्पाने पालन केले. तीन दिवस उपवास करून चवथ्या दिवशी ती पारणे सोडीत असे. देव, ब्राह्मण, गुरु व