पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ बृहद्यागवासिष्टसार. दास झाला. अति विषयासक्तीमुळे त्याचा विवेक व पूर्वीचे गुण हळु हळु क्षीण होऊ लागले. त्याचे स्थान दोष भरून काढू लागले व तो सतत अतृप्त असल्याचा भास होऊ लागला. त्याच्या वृत्तीवर घडलेला हा परिणाम त्याच्या प्राणप्रियेच्या ध्यानात आला. त्याबरोबर तिचे मन खिन्न झाले व ती असा विचार करू लागली की, हा माझा प्राणाहूनही प्रिय असलेला पति आज सार्वभौम राजा आहे, तरुण आहे, श्रीमान् व साम- र्यवान् आहे आणि त्याची आज्ञा भूमीवरील सर्व प्राणी शिरसा मान्य करीत आहेत, हे खरे, पण याची ही अवस्था सतत अशीच राहील की, पुढे तिचा ह्रास होणार आहे ? पुष्कळ वेळ विचार केल्यावर तिच्या ध्यानात आले की, मृत्यूचे उल्लघन कोणालाही करिता येत नाही. या सृष्टीतील प्रत्येक वस्तु मृत्यूच्या जणु काय विस्तृत मुखातच पडलेली आहे, त्रिभुवनात असा एकही प्राणी नाही की, जो या मृत्यूस प्रतिबंध करील. ही परम सत्य गोष्ठ तिच्या मनात येताच ती दीन व खिन्न झाली. माझा हा सुदर व साम- र्थ्यवान पति मृत्यूच्या दाढेतून कसा सुटेल ? तो अजरामर कसा होईल ? त्यान्या बरोबर मला असाच दीर्घ काल विलास करावयास कसा सापडेल? ही चिता तिला लागली. जप तप, दाने इत्यादिकाच्या योगाने मृत्यूस जिकलेच पाहिजे. त्यावाचून आपणास दीर्घ काल सुख भोगावयास सापडणार नाही, असा तिच्या मनाचा ग्रह झाला तिने ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध व विद्यावृद्ध ब्राह्मणास आपल्या भव्य वसति-स्थानी बोलावून आणविले. त्याची मोठ्या सत्काराने पूजा केली व त्यास सतुष्ट करून ती मोठ्या विनयाने ह्मणाली, "अहो भूदेव, मनुष्ये अमर कशी होतील ? माझी इच्छा आहे की, सर्व मनुष्यानी दीर्घ प्रयत्न करून या घातक मरणास जिकावे. कारण या मृत्यूमुळेच जगात किती अनर्थ होत आहेत, हे तुझास विदित आहेच. एकादे अति कठिण तप किवा जप अथवा एकादा यज्ञ असल्यास मला सागा, ह्मणजे मी त्याचे अनुष्ठान करून मृत्यूस जिकीन." हे तिचे अश्रुतपूर्व भाषण ऐकून सर्व विद्वान् ब्राह्मण चकित झाले. त्यातील कित्येकास तर या वेड्या बाईला माता काय उत्तर द्यावे तेच समजेना! पण त्यात जे कित्येक धीर व तत्त्वज्ञ होते ते