Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १६, १७. १६७ मुखसाधनानी सपन्न होता. तरी पण त्याने शास्त्र व वर्णाश्रमधर्म याची मर्यादा कधीही उल्लघिली नाही. शत्रुरूपी अधकाराचा तर तो प्रखर सूर्यच होता. त्याच्यामध्ये एकादा क्षुद्र दोपही नव्हता. तो देवानाही मोठे सहाय करीत असे. या भूलोकी तर त्याची कीर्ति सर्वत्र पसरली होती. तो मोठा गुणग्राही असून आपल्या मनास व इद्रियास त्याने स्वाधीन ठेविले होते. त्याला वेदविद्येप्रमाणेच इतर सर्व विद्याही अतिशय आवडत असत. सर्व चमत्कारिक गुण त्याच्या ठिकाणी होते. देवशत्रु राक्षसाचा तर तो मूर्तिमान् काळ होता. तो मोठा विलासी, सौभाग्यसपन्न, सौजन्याने परिपूर्ण व उत्साही असे. त्याच्याप्रमाणेच व्याची लीलानामक भार्या सर्व स्त्रीगुणसपन्न असे. त्या पतिव्रतच्या गुणाचे तर वर्णनच करवत नाही. तिचे ते सौदर्य, तिचे ते मनोहर भापण, तिचे ते पतिप्रेम, तिचा तो पूज्यभाव, तिची ती आनदी वृत्ति व वर्मावरील प्रेम ही सर्वच अलौकिक होती. ती सावी सतत आपल्या पतीच्या सेवेत निमग्न असे खरोखर त्या जोडप्यास पाहून रतिमदनाचीच आठवण होत असे. पति उद्विग्न आहे असे पाहताच तिचं चित्त उद्विग्न होत असे, त्याची आनदी वृत्ति पाहून ही मनात आनदित होई व तो शारीरिक पीडेने व्याकुल झाला असता तीहि व्याकुळ होई. साराश त्या उभयताची वृत्ति बिब-प्रतिबिबाप्रमाणे होती १५ सर्ग १६, १७-विपयोपभागाने तृप्ति होत नाही तर ते जमे जसे अधिक भोगावे तशी तशी अतृप्ति वाढत जाते त्यामुळे अतिशय दु ख भोगाव लागते व त्याचा प्रतीकार कोणालाही करिता येत नाही. तसंच लीलेचे तप, राजाचा मृत्यु व स्वप्नदर्शन याचे येथे वर्णन केले आहे श्रीवसिष्ठ-राघवा, भूलोकची जणु काय अप्सराच अशा त्या लीलेबरोबर त्या राजाने वने, उपवने, जलमदिरे, लतामडप, पर्वत, नदी- तीर, गुहागृहे, सरोवरे, लतागृहातील पुष्प-पल्लवादि शय्या इत्यादि निर- निराळ्या प्रदेशी नानाप्रकारचे विलास केले. या जगातील एकही भोग व एकही भोगसाधन त्याने उपभोग घेतल्यावाचून ठेविले नाही नृत्य, गायन, खान, पान, क्रीडा, विलास, विद्या, शास्त्रे, इत्यादि सर्वाचा त्याने पथेच्छ आस्वाद घेतला. त्यामुळे आसक्ति वाढली. विपयोपभोगावाचून यास काही सुचेनासे झाले. तो विपयाचा व आपल्या विचित्र इच्छाचा