पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १४. नेत्र इत्यादि ज्ञानेद्रिये होत असते. साराश, येणेप्रमाणे जीव व जग हे मुख्य तत्त्वाहून पृथक् पदार्थ नाहीत. तर सर्व-विशेषशून्य चैतन्याच्या प्रकाशाचीच ही छटा आहे. कार्य, कारण इत्यादि काहीही त्याहून भिन्न नाही. ते चैतन्य अच्छेद्य, अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य, नित्य, सर्वगत, निर्विकार, अचल व अप्रमेय आहे. परंतु हे परम रहस्य ज्यास कळत नाही ते द्वैतवादी आपापल्या भ्रमानी दुसन्यास भ्रमयुक्त करीत असतात व आपसात उगीच कलह करीत रहातात. आम्ही अद्वैतनिष्ठ झाल्यापासून भ्रमशून्य झालो आहो. आ- झाला आता तत्त्वाविषयी सशय मुळीच राहिला नाही व त्यामुळे आमास त्या भ्रमिष्ठाप्रमाणे कधी कोणाशी वाद करण्याचा प्रसगही येत नाही. ज्ञानी व अज्ञानी याच्या समजुतीत जो भेद असल्यासारखा भासतो त्याचे खरे बीज असे आहे की, ज्ञानी अमूर्त तत्त्वास सत्य समजतो व मूर्त तत्त्वास असत्य समजतो आणि अज्ञानी मूर्तास सत्य मानितो व अमूर्तास असत्य समजतो. द्वैत व अद्वैत हा भेदही या असल्या भिन्न समजुतीमुळेच उद्भवतो. कारण मूर्तास जे सत्य मानितात त्यास प्रत्येक वस्तु इतर वस्तूहून पृथक् वाटते. त्यामुळे ते द्वैताचा अगीकार करितात. पण अमूतोस सत्य समजणान्या ज्ञान्यास एका अमूर्तावाचून काही भासत नाही व अमूर्त वस्तूमध्ये भेद आहे, असा अनुभव येणेही शक्य नाही. त्यामुळे ते अद्वैताचा अगीकार करितात. आम्ही मूर्तास असत्य मानून एकरस व नित्य अमूर्तास तत्त्व समजणारे अद्वैतवादी आहो. द्वैत हा आमच्या अद्वैताचाच एक प्रकार आहे. या सृष्टीत इंद्रिये, मन इत्यादि साधनाच्या द्वारा ज्ञान होणारे सर्व वस्तुजात चैतन्याच्या आधाराने असते. प्रत्येक वस्तूतील शक्ति त्या महात्म्याच्या मायासज्ञक शक्तीचाच एक भाग आहे. सत्ता हेच त्या प्रभूचे शरीर आहे. जगाची सत्ता त्याच्या स्वरूपभूत सत्तेहून भिन्न नाही. त्याच्या सत्तेचेच हे सर्व विकार आहेत. यास्तव, बा रघुवीरा, तू आता असा निश्चय कर की, हे सर्व त्रिभुवन त्या महा चितीमध्ये शून्यरूप आहे व हे सर्व दृश्य त्या परम--पदमय आहे. मी एवढा वेळ जे काही सागितले आहे त्याचा चागला विचार करून जर तूं आपला अनुभव पहाशील तर तुला माझ्या ह्मणण्याची सत्यता कळून येईल.