पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ बृहद्योगवासिष्टसार. पदार्थ ज्याच्याहून निराळा नसतो, तो स्वतः शून्य असून वस्तुतः त्या पदार्थाच्या स्वरूपाचाच असतो. जलादि सावयव पदार्थाचे सावयव विकारही जर आपल्या कारणाहून भिन्न नसतात तर निरवयव चैतन्याचे विकार त्याच्याहून निराळे नसतात, हे काय सागावे ? एव च नाम, रूप, क्रिया, कार्य, कारण इत्यादि सर्व धर्मशून्य चैत- न्यच या भ्रामक जगाचे तात्त्विक स्वरूप आहे. मन, बुद्धि, अहकार, महाभूते, पर्वत, नद्या, समुद्र, वृक्ष, पापाण इत्यादि अनेक प्रकारचे अनेक भिन्न पदार्थ जरी अनुभवास आले तरी ते सर्व त्या शुद्ध चैतन्याचेच विवर्त आहेत. त्या परा देवतेचेच ते धर्म आहेत. घटाच्या घटत्वाप्रमाणे, मनुष्याच्या मनुष्यत्वाप्रमाणे, ब्राह्मणाच्या ब्राह्मण्याप्रमाणे चित्चे चित्त्व केवल कल्पनेने भिन्न आहे. वस्तुतः (चित्- हून चित्त्व ) भिन्न नाही. चित्त्व हेच जग आहे. कारण चित्पणा जगास सोडून राहत नाही व जग त्यास सोडून रहात नाही जग नाहीसे झाले की चित्त्वही गेले. ह्मणजेच हा केवळ काल्पनिक भेद आहे, वास्तविक नव्हे. पण तो भ्रामक भेद असतो कसा व परिणाम, विकार इत्यादि शब्दानी त्याचा व्यवहार होतो कसा ? ह्मणून विचारशील तर सागतो. हा सर्व त्या परमात्म्याच्या शक्तीचा प्रभाव आहे, चैतन्याची विषयास प्रकाशित करणारी शक्तिच जीव व त्याची उपाधि ( भूततन्मात्रे ) होऊन जग या स्वरूपाने व्यक्त होते. चितीपासूनच अहकाराचे स्फुरण होते. तेच स्पदन- कर्म करणाऱ्या प्राणाने युक्त झाले असता, जीव होते. पण इतके झाले तरी चैतन्याच्या स्वभावात काही अतर पडत नाही. आता कदाचित् तूं ह्मणशील की, चिन्छक्ति व स्पदनशक्ति यामध्ये भेद असल्यामुळे अहकार व प्राण या उपाधीनी युक्त असलेला जीवही भिन्न आहे. पण ते बरोबर नाही. कारण चित् ही शक्ति ज्याच्यामध्ये प्रधान (मुख्य ) आहे तो अहंकार कर्ता असतो व स्पद ही शक्ति ज्याच्यामध्ये मुख्य आहे तो प्राण क्रिया आहे. कोणताही कर्ता आपल्या क्रियेच्या योगाने कधीही भिन्न होत नसतो. यास्तव सत्, चित् व स्पद यानी युक्त असलेला पुरुषच जीव होय. याचप्रमाणे चित्त, मन, इद्रिये इत्यादिकाच्या अस्तित्वामुळेही जीवाच्या स्वरूपात काही भेद पडत नाही. इद्रिये हा मनाचाच विकार आहे. ह्मणजे मनच कर्ण, नेत्र, इत्यादि गोलकात प्रविष्ट होऊन श्रोत्र,