पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १४. १६३ मुक्ति, ब्राममुक्ति ह्मणजे प्रथम हिरण्यगर्भाची प्राप्ति व नतर समब्रह्माची प्राप्ति अशी क्रमाने मिळणारी असते. ताबे, लोखड इत्यादि धातूचे सोने करावयाचे असल्यास तेही असेच साक्षात् किवा परपरेच्या उपायाने करिता येते. परीसाचा स्पर्श होताच हीन धातृचे सोने होते (अस साग- तात ) हा साक्षात् उपाय आहे व काही औषधाची योजना करून ताम्रादि वातून तापावेल्यानेही त्याचे सोने होते, असे किमया करणारे लोक सागतात. हा क्रमोपाय आहे. किवा या द्विविध मुक्तीस आणखी एक प्रसिद्ध दृष्टान्त आहे पक्षी झाडावरील फलास एकदम जाऊन गाठतो व मनुष्य हळू हत वर चढून अगोदर झाडाच्या मुख्य शाखेवर, नतर ते फळ ज्या टाळीवर असेल त्या किवा तिच्या जवळच्या दुसऱ्या दृढ शाखेवर मावधानपणे जातो व शेवटी मोठ्या प्रयासाने ते फळ काढतो. अमो; तात्पर्य, याप्रमाणे विचार केला असता, जीव व जगत् हे दोन्ही भाव गृद्ध चैतन्याचे चमत्कार आहेत, असे कळते. अहकारपूर्वक हे सर्व चमत्कार उद्भवतात. अहकार चैतन्याच्या अधीन असतो व तो काल्पनिक आहे अर्थात् हे सर्व काल्पनिक चमत्कारजाल ज्याच्या अधीन राहूनच उद्भवते, तो सर्वात्माच सदा सत्य असतो, हे उघड आहे. जीव व जीव- भाव प्राप्त होण्याच कारण याचा त्याग केला ह्मणजे कल्पना करणाराच कोणी रहात नसल्यामुळे एक सन्मात्र आत्मा अवशिष्ट रहातो. मग तू, मी, हा, तो इत्यादि कोणताही व्यवहार होत नाही अविद्या, काम ( वासना ) व कमें ही जीवभागाची निमित्ते आहेत. मेघ नाहीसे झाले असता निर्मळ आकाश जसे दिसू लागते त्याप्रमाणे (आत्ममाक्षात्कार- सज्ञक ) ज्ञानाच्या योगाने सवे दृश्य, त्याची सत्ता व अविद्या काम-कर्म याचा नाश झाला असता पूर्वीच सिद्ध असलेली अधिष्ठान-सत्ता व्यक्त होते. आता हाच सिद्धान्त अनुमानानेही कसा सिद्ध करिता येतो तो पहा. हे स्थूल-सूक्ष्म जग शून्य आहे कारण. तो सर्व चैतन्याचा चमत्कार आहे. चमत्कार ह्मणजे विलास किंवा विकार. जो ज्याचा चमत्कार असतो तो त्याच्याहून भिन्न नसतो. तरग, बुडबुडे इत्यादि जलाचा 'चमत्कार आहे, त्यामुळे तो जलाहून भिन्न नाही. तसाच जग हा चैतन्याचा चमत्कार असल्यामुळे त्याहून निराळा नाही. जो