पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ बृहद्योगवासिष्ठसार. मजप्रमाणे सत्यसकल्प होऊ नये. कारण, तेही सत्यसकल्प झाल्यास जगाची व्यवस्था करणे कठिण होईल, असा तो सकल्प करितो व न्यामळे सर्व जीव सत्यसकल्प होत नाहीत. ते त्या समष्टि-ईश्वराच्या अधीन राहूनच आपापले ईश्वराने नेमून दिलेले काम करीत असतात असे जर आहे, तर काही ऋपि सत्यसकल्प होते, असे जे पुराणात वर्णन आढळते, त्याची उपपत्ति कशी लावावयाची ? ह्मणून विचारशील, तर सागतो त्या हिरण्यगर्भाने “ हा अमुक ऋषि अमुक अमुक निग्रहानुग्रह सामर्थ्याने युक्त होवो " अशी इच्छा करूनच त्यास निर्माण केलेले असल्यामळे तेही त्याच्या इच्छेचेच फल होय तात्पर्य, जीवाची कोणतीही शक्ति, ईश्वरानुग्रहामुळेच त्यास प्राप्त झालेली असते, हे तू चागले ध्यानात टेव जगात जा नियम, जो सिद्धात. जो कार्यकारणादिभाव, जी क्रिया, जे सुग्वादि फल किवा जे जे ह्मणून काही प्रतिक्षणी होत आहे, ते त्या नियामक अतर्यामीच्या सत्यसकल्पान- रूपच होत आहे. हा एक परम सिद्धात तू ध्यानात धरिलास ह्मणजे तुला कशाचीही चिता ररणार नाही, कोणताही मशग रहाणार नाही व तू-हे परम रहस्य न जाणणाऱ्या पामराप्रमाणे या सृष्टीतील कोणत्याही अवस्थेत-व्याकुल होणार नाहीस. असो, साराश, ब्रह्म हाच महाजीव आहे. त्याला आदि नाही व अत नाही. तोच केवल कल्पनेने समष्टि व व्यष्टि होतो. विषयास जाणत्यामुळे ब्रह्मच जीव होते व ससारभ्रमणात पडते, आणि विपयज्ञानाच्या अभावी तेच पुनरपि आपल्या समरूपास प्राप्त होते, पण एकदा ससारात पडत्यावर पुनः समरूपास प्राप्त होणे फार कठिण आहे पुष्कळ प्रयत्नावाचन ती स्थिति प्राप्त होत नाही कर्म, उपासना व ज्ञान हे त्या प्रयत्नाचेच प्रकार आहेत. निष्काम कर्मयोगाचे अनुष्टान केल्याने चित्त शुद्ध होते व चित्त शुद्धीच्या योगाने ज्ञानप्राप्तीची योग्यता येते आणि शेवटी ज्ञान (आत्मसाक्षात्कार ) होऊन जीव आपल्या समस्वरूपास प्राप्त होतो अथवा कनिष्ठ जीव ज्येष्ठ जीवाची झणजे हिरण्यगर्भाची उपासना करून अगोदर त्यास प्राप्त होतो व नतर महा प्रलयसमयी त्याच्याबरोबर मुक्त होतो. असे हे मुक्तीचे दोन प्रकार आहेत. त्यातील पहिल्या प्रतीची मुक्ति साक्षात् झणजे या जन्मीच प्रत्यक्ष अनुभवास येणारी असते व दुसऱ्या प्रकारची