पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १४. ती ती मूर्त किवा अमूर्त वस्तु निर्माण झाली आहे, असेच त्याच्या अनु- भवास येते. आपल्या सत्तेच्या आधारानेच भासणाऱ्या-जीव, बुद्धि, क्रिया, स्पद, मन, द्वित्व, ऐक्य इत्यादि-सर्व भावास ते विषय करते. ह्मणजे त्याचा अनुभव घेते. पण या जीवादिकाचा भास अविद्येमुळे होतो व ती नाहीशी झाली की, ब्रह्मही निर्विक्षेप अवस्थेत असते. ब्रह्मात्मसाक्षात्कार हेच तिच्या नाशाचे कारण आहे. त्या साक्षात्कारासच विद्या असे ह्मणतात. विद्येचा उदय होताच अविद्येचा अस्त होणे युक्तच आहे. आता निवृत्त झालेली ती आत्म्याची अविद्या हणजे आत्म्याचे अज्ञान कोणत्या रूपाने रहाते ह्मणून विचारशील तर सागतो. दीप लावताच अंधकार जसा लुप्त होतो व तो दिव्याच्या प्रकाशात जाऊन मिळाला की, आणखी कोठे जाऊन राहिला हे कळत नाही, त्याप्रमाणे विद्येच्या उदयाबरोबर नाहीशी होणारी, अविद्या कोठे जाते किवा कोणत्या रूपाने रहाते ते कळत नाही. साराश, ब्रह्मच जीवात्मा आहे. त्याचा नित्य अभेद आहे, ह्मणजे त्याच्यामन्ये भेद केव्हाही नसतो. ब्रह्म निराळे व जीवतत्त्व निराळे असे कधीही होत नाही. सर्वशक्ति, अनादि, अनत व केव्हाही बाधित न होणारी, ह्मणजे केव्हाही मिथ्या न ठरणारी, अशी एक महा चितिच आहे. चिति, चैतन्य, ब्रह्म इत्यादि सर्व त्या परम तत्त्वाचीच व्यावहारिक नावे आहेत. ते तत्त्व सर्वतः अमर्यादित आहे. " ते येथून येथपर्यंत आहे " असा त्याचा परिच्छेद करिता येत नाही. ते सर्वव्यापी आहे; त्यामुळे जगातील कोणताही भेद त्याच्या बाहेर त्यास सोडून राहू शकत नाही. श्रीराम-गुरुराज, आपले हे ह्मणणे मला मान्य आहे; पण समष्टि व व्यष्टि याचे ऐक्य मानिल्यास व्यष्टि जीवाचे सकल्पादिक सत्य होऊ लागतील. कारण, त्याचे सकल्प व समष्टि जीवाचे सकल्प यामध्ये, त्यास एक मानिल्यावर, काही भेद उरत नाही आणि असे झाल्यास भोग व, मोक्ष यांची व्यवस्था लागत नाही. श्रीवसिष्ठ-प्रथम ब्रह्म समष्टि जीवभावास प्राप्त होते. तो समष्टि जीव सत्यसंकल्प व सर्व शक्तिमान् असतो. जगाची व्यवस्था योग्य रीतीने लागावी अशीच त्याची इच्छा ( सत्यसकल्प) असते व त्यामुळे व्यष्टि जीवभावास प्राप्त होण्यापूर्वीच या व्यष्टि जीवांनी