पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० बृहद्योगवासिष्ठसार. वतात ? समष्टीपासून वरील दृष्टाताप्रमाणेच याचा उद्भव होतो, र समजल्यास ते अनित्य आहेत, असे होणार व जीव अनित्य आहेत, उ ठरले की कृतप्रणाश व अकृत-अभ्यागम हे दोष अनिवार्य होण केलेल्या कर्माचे फल न मिळणे हा कृतप्रणाश व न केलेल्या कम फल भोगावे लागणे हा अकृत-अभ्यागम होय. जीव शरीराबरो नवीन उत्पन्न होतो व शरीराबरोबर नाहीसा होतो, असे ह्मण जीवाचे अनित्यत्व मानिले झणजे १ पूर्वी कधी न केलेल्या कर्मान सुखदुःखादि-फलभोग या जन्मी भोगावा लागणे व २ या जन्मीं केले कमें जीव शरीराबरोबर नष्ट होत असल्यामुळे, फळ भोक्त्याच्या अभाव फळ दिल्यावाचून, नाहीशी होणे, हे पूर्वोक्त दोष अपरिहार्य होतात शिवाय त्या समष्टीची सभावनाच करिता येत नाही. म्हणजे जिच्यापासू जीव उद्भवतात असे कदाचित् म्हणता येणे शक्य आहे, ती समष्टि आ असे प्रबल प्रमाणानी ठरत नाही. श्रीवसिष्ठ--रामा, जीव एक आहे, एवढे सुद्धा जर आमास मान् नाही तर त्याच्या राशीचे नाव कशाला घेतोस ? “सशाचे शिग उडून गेले" या ह्मणण्याप्रमाणेच तुझे हे वचन मला आश्चर्यकारक वाटते वस्तुतः जीव एक नाही, त्याची रास नाही व तो पर्वताप्रमाणे एक गोळाह नाही. तर एका ब्रह्मतत्त्वावर अनेक कल्पना झाल्या आहेत. समष्टि, व्यष्टि इत्यादि कल्पनाचे अधिष्ठान ब्रह्म आहे व तेच आत्मा आहे, असे साक्षात जाणल्याने सर्व ससारधर्मापासून मुक्त होणे हे परम फळ मिळते. यास्तव समष्टि, व्यष्टि इत्यादि ही सर्व कल्पना मी रचली आहे. कारण तश कल्पना केल्या वाचून वर सागितलेला साक्षात्कार होत नाही. अर्थात ही कल्पना ह्मणजे तो ब्रह्मात्मसाक्षात्काराचा उपाय आहे. समष्टि, व्यष्टि. जीवाची उत्पत्ति इत्यादि सर्व सत्य आहे, अशा अभिप्रायाने मी त्याचे वर्णन केलेले नाही. तेव्हा तुझ्या प्रश्नास अवकाशच कोठे राहिला ? रामा. जीव हा शब्द, त्या शब्दाचा अर्थ, त्याचे अवातर प्रकार, सृष्टीचा उद्भव इत्यादि सर्व मिथ्या आहे; सत्य नाही, असे तू निश्चयाने जाण व हा आपला निश्चय ढळू देऊ नकोस. शुद्ध, चिन्मात्र, व अमल ब्रह्मच सर्वगामी आहे. त सर्व-शक्तियुक्त असल्यामुळे त्याचा कोणता- ही सकल्प व्यर्थ जात नाही. ते ज्या ज्या वस्तूविषयी कल्पना करिते