पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. प्रमाणे हा प्रकार घडतो. किवा स्वप्न, सकल्प, इत्यादि प्रसंगी बाहेरचा विषय जसा सूक्ष्म नाडीत जसाच्या तसाच भासतो त्या- प्रमाणे भावि देह त्या सूक्ष्म शरीरातील कल्पित सूक्ष्म आकाशात भासतो हा वासना देह व्यवहारदृष्टया चित्तरूप आहे. कारण तो त्याचा परिणाम आहे, पण परमार्थदृष्टया तो ज्ञान, सत्ता व आनदरूप आहे. असो, स्थूल देहाच्या भावनेने तो जीव तद्रूप होतो. नतर मी आता पहातो, असा सकल्प करून तो दोन रध्रातून जणुकाय या महा आकाशात पसरतो. त्यामुळे त्यास रूपयुक्त वस्तूचे ज्ञान होऊ लागते. ज्याच्या योगाने तो बाहेर पसरून पदार्थास पहातो त्यास नेत्र ह्मणतात. ज्याच्या योगाने तो स्पर्शास जाणतो ती त्वक, ज्याच्या योगाने तो ऐकतो ते श्रवणेद्रिय, ज्याच्या योगाने तो वास घेतो ते प्राण व ज्याच्या योगाने तो रसास्वाद घेतो ते रसनेद्रिय होय. स्पदन हाच वायु, चेष्टा हीच कर्मेद्रिये इत्यादि सर्व सामग्री केवल त्याच्या भावनेने निर्माण होते, व त्याला तो स्वकल्पित आकार अडामध्येच दिसू लागतो. याप्रमाणे स्फुलिगाप्रमाणे केवल कल्पनेने हिरण्यगर्भापासून भिन्न झालेल्या असख्य जीवातील कोणी जलात असलेल्या ब्रह्माड-शरीरावर अहभाव ठेवितो व कोणी त्याच्या आतील चतुर्मुखादि शरीरावर अहभाव ठेवितो. याप्रमाणे तो भावि ब्रह्माडाची कल्पना करितो व त्याचा अनुभवही घेतो. सकल्प हेच त्याच्या गर्भवासाचे निमित्त आहे. तो ईश्वर अमुक देशात, अमुक समयी, अमुक जातीत, अमुक प्रकारे माझा जन्म व्हावा, मी अमुक अमुक कर्मे करावी इत्यादि भावना करूनच त्या त्या विषयास व आपणास बद्ध करून घेतो. साराश, असा हा असत्य भ्रम उद्भवतो. आता पूर्वी सागितल्याप्रमाणे आहिवाहिक शरीराने युक्त असलेला स्वयभू वस्तुतः कसा उत्पन्न होत नाही व त्यामुळेच तो स्वतःच भ्रमाने कसा उत्पन्न झाला आहे, हे तुला चागले समजेल. तो प्रभु आद्य प्रजापति आहे; पण तो आद्य कर्ताच भ्रामक असल्यामुळे व त्याच्या उत्पत्तीची व्यवस्था लागत नसल्यामुळे या ब्रह्माडाकार भ्रमात काहीएक उत्पन्न झालेले नाही. भ्रामक दृष्टि सोडून पारमार्थिक दृष्टीने पाहिल्यास एका शुद्ध ब्रह्मावाचून दुसरे काहीएक सत् नाही, असा अनुभव येतो. ह्मणूनच आह्मी या जगास स्वप्नांतील नगर ह्मणून ह्मणतो. जग हे एक