पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १३. असो; आता जीव अतःकरण, श्रोत्रादि बहिरिद्रियें, स्थूल देह इत्यादि- कांशी आपले तादात्म्य कसे करून घेतो तें सागावयाचे आहे. पण अगो- दर समष्टि-जीवाच्या उपाधीपासून भावनेनेच व्यष्टीच्या अतःकरणाचा अकुर कसा उगवतो ते सागतो. त्या परमात्म्याच्या ठिकाणी कल्पनेने उद्भवलेलें समष्टि-जीवाकाश आपले स्वरूप विस्तृत असतानाही आपण अग्नीच्या ठि- णीप्रमाणे अगदी अल्प आहो, असे चितन करून तसेच होते. ह्मणजे त्याला मी अगदी अल्प आहे, असा अनुभव येतो एवढ्याकरिताच श्रुतीमध्ये-जसे प्रदीप्त अग्नीपासून क्षुद्र विस्फुलिग (किटाळे, ठिणग्या ) निघतात त्याप्रमाणे आत्म्यापासून हे सर्व प्राणी उद्भवतात, असे झटले आहे. असो, तात्पर्य त्याच्या भावनेमुळेच तो असा विकार पावतो. तो जी जी भावना कारतो तसा तसाच त्याला अनुभव येतो. पण अशा सकल्पामुळे अनभवास येणाऱ्या वस्तु खन्या नसतात. तर त्या कल्पित, मिथ्या, असत् असतात याप्रमाणे त्या अल्प स्वरूपाची भावना करीत असतानाच तो द्रष्टा व दृश्य होतो. कारण अणुरूप भावनेने अणुरूप होताच त्याला आपल्याच स्वरूपाचा अति मोठा भाग आपल्याहून भिन्न वाटू लागतो. ज्यास तो भिन्न वाटतो तो द्रष्टा व जो भिन्न वाटतो तो सर्व भाग दृश्य होतो ह्मणजे वस्तुत: तो एकच असताना, स्वप्नात जसे आपण मेलो आहो, असे पहावे त्याप्रमाणे तो द्विरूप होतो पण या द्रष्ट-दृश्यभावामुळे त्याच्या मूळ अणुतेजःस्वरूप-आकृतीत थोडीशी भर पडून तो एकाद्या नक्षत्रासारिखा जणु काय स्थूल होतो. हाच त्याचा भूतमात्रानी परिवेष्टित झालेला लिग देह आहे. त्यास तो 'अह' असे समजतो. पण हा लिगदेह-प्रत्यय व पुढे होणारा स्थूल-देह-प्रत्यय हे दोन्ही चित्ताच्या कल्पनेमुळेच होत असतात ह्मणजे स्वप्नात ज्याप्रमाणे एकाद्यास मी वाटसरु असून वाटेने चालत आहे, असे चित्ताच्या कल्पने- मुळे वाटावे त्याप्रमाणे हा सर्व प्रकार होतो. पुढे तोच नक्षत्राकार (लिगशरीराकार ) जीव पुढील देहाची भावना करितो. ( पुढील देहाच्या आकाराचे चितन करितो. ) ह्मणजे चित्त जसे विषयाच्या आकाराची भावना करिते त्याप्रमाणेच तो देहाकाराची भावना करितो. या भावना करणाच्या जीवाच्या नक्षत्रतुल्य शरीरात त्या भावि स्थूल देहाच्या आकाराचे भान मोहामळे होते आरशींत जसे पर्वताचे प्रतिबिब पडावे त्या-