पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १३. श्रीवसिष्ठ-रामा, वरच्या सर्गात ब्रह्मापासून मिथ्या जगद्भाव कसा उद्भवतो ते सागितले. आता या सर्गात त्या ब्रह्मालाच जीवभाव कसा प्राप्त होतो व त्या जीवास देहादिकाची प्राप्ति कशी होते ते मला सागाव- याचे आहे. पण अगोदर सुषुप्तीप्रमाणे प्रलय काली लीन होऊन मायाश- बल-ब्रह्मभावास प्राप्त झालेल्या जीवाच्या अंतःकरणादि उपाधीचा पुनः कोणत्या क्रमाने आविर्भाव होतो तें सकारण सागितले पाहिजे. सर्वव्यापी, सम, मायाशबल, अधिष्ठानभूत, व उत्पन्न न झालेल्या आकाश-तेज-तम इत्यादि भूतान्या कारण-सत्तारूप चिदात्म्याचे ठायी विषय, चित्त, जीवभाव व अहभाव क्रमाने उत्पन्न होतात. त्या सद्रूप परमात्म्यास प्रथम चेत्य-विषय--मय सृष्टीस निमाण करावे, असे स्फुरण होते. ह्मणून विषयकल्पना सर्वाच्या पूर्वी होते, असे ह्मणावे लागते. नतर चित्तरूप इद्रियाची कल्पना होते. कारण त्यावाचन विपयाची सिद्धि होत नाही. प्रत्येक अनुभव अत करणाच्या अधीन असल्यामुळे कोणत्याही अनुभ- वाच्या पूर्वी त्याची सिद्धि मानावीच लागते. त्यानतर चेत्याच्या सयोगाचा प्रकाश करणारा जीवभाव उत्पन्न होतो आणि शेवटी, मी विषयमय आहे, असे मानल्यामुळे अहभावाची सिद्धि होते. अहतेच्या परिणामामुळे बुद्धीची कल्पना होते. ते बुद्धितत्त्वच वासनारूपाने चित्तात लीन होऊन राहिलेल्या विषयाचे मनन केल्यामुळे मन होते. त्यानंतर वासनात्मक शब्द-तन्मात्राचे स्पशोदि-तन्मात्राशी मिश्रण झाल्यामुळे स्थूल भावास प्राप्त झालेल्या मनापासून हा असला विस्तीर्ण प्रपच प्रकट होतो. या- प्रमाणे एका क्षणात हा सर्व कार्यवर्ग उत्पन्न होऊन स्वप्नातील नगराप्रमाणे वारवार नाहीसा होतो. हे जगद्बीज वस्तुत पृथ्वी, जल, अग्नि इत्यादि- कातील कशाचीही अपेक्षा करीत नाही. कारण त्या चिन्मात्रामध्ये सकल्पाने काय पाहिजे ते करण्याची शक्ति असते. तात्पर्य या सर्व प्रपंचाचे कारण तेच एक परम तत्त्व आहे. त्याचे जे बीज तेच फल आहे, असे तू जाण. ह्मणजे जग ब्रह्ममय कसे ते तुझ्या ध्यानात येईल ___ असो; विषयास प्रकाशित करणान्या चिच्छक्तीने सृष्टीच्या आरभी महाकाशामध्ये हा अशा प्रकारचा भूतपचकसमूह कल्पिला. तो त्या चिच्छक्तीच्या शरीररूपच असतो. तिच्याहून निराळा नसतो आणि त्यामुळेच तो मिथ्या आहे. त्या भूतपंचकापासून हे स्थूल जग होते. पण