पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ बृहद्योगवासिष्ठसार. रहात होती. पुढे होणाऱ्या मोठ्या थोरल्या वडाच्या झाडाचा अवाढव्य विस्तार जसा मोहरीहूनही सूक्ष्म असलेल्या आपल्या बीजामध्ये, बीजाच्या सत्तेनेच, असतो तसाच या ब्रह्माडाचा प्रकार समज. तूं कदाचित् म्हण- शील की, ज्यामध्ये थोडासाही अवकाश नाही या तन्मात्रामध्ये स्थूल भूताची सृष्टि कशी रहाणार ? तर त्याचे उत्तर सागतो; ऐक. स्थूल सृष्टि खरोखरच काही तेथे रहात नाही. तर तिची भ्रामक उत्पत्ति त्याच्यापासून होते, असे भासते व असली काल्पनिक उत्पत्ति परमाणू- पासूनही होणे शक्य आहे. स्वप्नामध्ये अतिसूक्ष्म नाडीच्या छिद्रात हे अवाढव्य जग दिसते की नाही ? तशीच ही स्थूल सृष्टि सूक्ष्म बीजात असते, असे समज. फार काय पण ती तन्मात्रे जरी स्थूलभावास प्राप्त झालेली असली तरी त्याच्या सूक्ष्मतेची हानि होत नाही. कारण त्याचा स्थूलभाव हा एक विवर्त आहे. विवर्त असल्यामुळेच त्याच्या परिणामास अगदी वेळ लागत नाही. तर एका क्षणात कल्पाचे कामही होऊन जाते. क्षणभर पडलेल्या स्वप्नात एकादे वेळी शभर वर्षाच्या इतिहासाचा अनु- भव येतो, हे प्रसिद्ध आहे. __ ही सर्व भूते विकाररहित चैतन्याने अनुविद्ध असतात. अनु- विद्ध म्हणजे व्याप्त. या भूताच्या परिणामाचे वेळी विवर्त-वादाचा स्वीकार न केल्यास झाडाच्या एकाद्या फळाप्रमाणे अथवा कोव्हाळा, काकडी इत्यादिकाप्रमाणे हळु हळु वाढणाऱ्या या जगाच्या उद्भवास अनत काल लागणार, हे उघड आहे. साराश याप्रमाणे ते चैतन्य सकल्पाच्या योगाने तन्मात्रगणरूप होते व सकल्पामुळेच त्याचा मिथ्या ब्रह्माडाकार बनतो. म्हणजे ब्रह्मच जगदाकार होते, हे आमचे म्हणणे सिद्ध झाले. कारण जगाचे बीज शब्दादि तन्मात्रपचक आहे. त्या तन्मात्रपचकाचे बीज पर- मात्म्याशी साक्षात् संबध ठेवणारी मागाशक्ति आहे. तीच जगाच्या स्थितीचे कारण होते. याप्रमाणे ते अज, आद्य व चिन्मात्र परमात्मतत्त्वच माया- शक्तीच्या योगाने जगाचे बीज होत असून मायाशक्ति नाहींशी झाली असता ते अनिर्वाच्य ब्रह्म होते १२. सर्ग १३--ब्रह्मास मिथ्याजीवभाव कसा येतो व त्याला देहप्राप्ति कशी होते त्याचे येथे निरूपण केले आहे.