पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १२. १५१ प्रकारच्या रूपांचे ते कारण आहे. या तेजापासूनच सूर्य, चद्र, नक्षत्रे, ग्रह, विद्युत्, अनि इत्यादि ज्योति उद्भवतात. पुढे तो तेजोभूत आत्मा मी जलाचा रसस्कध आहे, अशी भावना करीत जलरूप होतो. त्याच्या पासून रसतन्मात्र उद्भवते. जलतत्त्वाचा मूते ( साकार ) समूह ह्मणजेच पाणी होय. त्याचा स्वाद घेतला असता त्यातील ज्या मधुर रसाचा अनुभव येतो त्याचे उपादान कारण हे रसतन्मात्रच आहे. रसच इद्रिय व विषय या रूपाने परिणाम पावतो. नतर रसनेद्रिय विषयरसाचे ग्रहण करिते व विषयरस त्यास आपणामध्ये आसक्त करितो. ह्यामुळे प्राणी पुनः पुनः विषयसपादन करावयाच्या खटपटीत पडतो व तीच त्याची प्रवृत्ति ससार बनते. शब्द-स्पर्शादि इतर चार विषयाचीही हीच स्थिति आहे. __ असो, हा जलरूप झालेला परमात्मा " पृथ्वीच मी आहे" या सकल्परूप होऊन पुढे होणाऱ्या पृथ्वीचे रूप व नाव याचे निमित्त होतो व गधसंकल्पाने मी स्वतः गधतन्मात्र झालो आहे, असे पाहतो. पुढे होणाऱ्या भूगोलाचे ते बीज होय. खरी खरी आकृति त्या भूगोलासच असते. मनुष्यादि आकार त्या भूतामध्येच उद्भवतात भावनेन पृथ्वीरूप झालेल्या त्या सर्वाधार परमेश्वरापासून सर्व ससार पसरतो. ___ याप्रमाणे आकाशादि सूक्ष्म भूते उत्पन्न होतात, नव्हे-स्वत तो परमात्मा केवल सकल्पाने आकाशाादे सूक्ष्म भूतरूप होतो. नतर त्या सूक्ष्मभूतापासून शब्दादि पचतन्मात्रे उद्भवतात. त्यापासून शब्दादि विशेष प्रकारचे विपय जन्मास येतात, व त्या त्या विषयाची ग्राहक इंद्रिये उत्पन्न होतात. येथवर सागितलेली ही सर्व सूक्ष्म सृष्टि होय, ती पुढे होणाऱ्या सर्व स्थूल सृष्टीचे बीज आहे. ___ आता येणेप्रमाणे उत्पन्न झालेल्या या भूताच्या मिश्रणाने ब्रह्माडा- कार कसा होतो; ते सागतो. वर सागितलेली “ भूतेच मी आहे " या भावास प्राप्त झालेल्या चितीने ( परमात्म्याने ) पुनः भावना केली असता तन्मात्रे एकमेकात मिसळून जलातील बुडबुड्याप्रमाणे स्वतः ब्रह्माडाकार होतात, व ती एकमेकात अशी मिसळून जातात की, सर्व नाश होई तो ती परस्पर पृथक् व शुद्ध आहेत, असे वाटत नाही. पण हा त्याचा स्थूल परिणाम होण्यापूर्वी ती अव्याकृतामध्ये ब्रह्मसत्तेनेच