पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५० बृहद्योगवासिष्ठसार. असो, आकाशच मी आहे, असे समजणार तें आकांशरूपी ज्ञान आकाशाचे कार्य जो वायु त्याच्या सकल्पाचे बीज होते. अर्थात् त्या आकाशरूपी अहकाराच्या एका परिमित अशापासून वायु उत्पन्न होतो. न्याच्यामध्ये प्राधान्येंकरून स्पदशक्ति असते. स्पद ह्मणजे किचित् चलन. आकाश व अहकार या उपाधीनी युक्त असलेल्या पर सत्तेपासूनच सर्व शब्दबीजभूत शब्दतन्मात्र उत्पन्न होते. पण पूर्वीच्या कार्याप्रमाणे तेही त्या परसत्तेच्या भावनेनेच होते, हे विसरता कामा नये. साख्य शास्त्र, व काही पुराणे यात तन्मात्रापासून भूताची उत्पत्ति झाली, असे सागितले आहे. पण ते उपनिषदातील वर्णनाच्या विरुद्ध आहे शिवाय शब्दसामान्य ह्मणजे शब्दत्व हेच शब्दतन्मात्र आहे. ते विशेषशब्दाचे उपादान आहे. यास्तव आकाशापासून शब्दसामान्यरूप शब्दतन्मात्र झाले, असे ह्मणण्यास काही प्रत्यवाय नाही. हे शब्दतन्मात्रच वेद-शास्त्रादि सर्व प्रमाण व अप्रमाण शब्दाचे उपादान कारण आहे. पुढे वेदभावास प्राप्त झालेल्या परमात्म्यापा- सून ही सर्व जगत्-श्री उद्भवते । वायूची उत्पत्ति झात्यानतर हिरण्यगर्भास जीव हे नाव प्राप्त होते. कारण त्यापूर्वी प्राणाची उत्पत्ति झालेली नसते. प्राण हे वायूचे कार्य आहे. यास्तव प्राणधारणेमुळे प्राप्त होणारी सज्ञा प्राणोत्पत्तीनतरच प्राप्त होणे योग्य आहे. ईक्षणापासून वायूपर्यंत उत्पन्न झालेली ही परिणामपरप- राच सर्व साकार सृष्टीचे कारण आहे असो, प्रत्येक शरीरात प्राणरूपाने रहाणारा हा वायु सर्व क्रियाचे कारण आहे. ह्मणजे त्याच्या योगानेच शरीराच्या, इद्रियाच्या व मनाच्या क्रिया होत असतात. चतुर्दश भुवनातील सर्व प्राण्याच्या स- चारास हाच कारण होतो वायुरूप झालेल्या त्या चैतन्या- पासून भावनेमुळे तात्काल स्पर्शतन्मात्र उत्पन्न होते. प्रत्यही प्रत्येक प्राण्याच्या अनुभवास येणाऱ्या नानाप्रकारच्या स्पर्शाचे तेच उपादान आहे. सृष्टीच्या मर्यादेचे रक्षण करणारे आवह, प्रवह इत्यादि एकूणपन्नास वायूही त्या मुख्य वायुतत्त्वाच्याच कार्यरूप आहेत. असो; वायुभावापन्न चैतन्याच्या सकल्पाने तेज हे भूत उत्पन्न होते. त्याच्यापासून रूपतन्मात्र उद्भवते. लाल, शुभ्र, पीत, नील इत्यादि सर्व