पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १२. उठते. त्या वेळी त्या कूटस्थ ब्रह्माच्या ठायी अहंकाराचा अध्यास झालेला नसतो; पण त्या वृत्तींत पुढे उत्पन्न करावयाच्या सृष्टीचे अनुसंधान असते. अशा त्या आकाशाहूनही सूक्ष्म व शुद्ध बोधासच इक्षण ह्मणतात. ती ईक्षणरूप वृत्ति त्यात व्यक्त झालेल्या चैतन्याने भरलेली असते. त्यामुळे ती चित् सर्वज्ञ, ईश्वर इत्यादि नावास योग्य होते. नतर ते ईक्षण दीर्घकाल अनुवृत्त झाल्यामुळे दृढ होते. त्यामध्ये मीच सूक्ष्म प्रपचरूप आहे, अशी भावना होते. त्यामुळे चैतन्याने भरलेली ती ईक्षणवृत्ति आपल्या परम पदास विसरते. त्या विस्मरणामुळेच तिला हिरण्यगर्भ- सहा प्राप्त हाते. या हिरण्यगर्भास पुढे जीव असेही ह्मणू लागतात. कारण त्यामध्ये प्राण व इद्रिये यास धारण करण्याची शक्ति असते. जीव ह्मणजे प्राणधारण करणे, असा जीव या शब्दात मूळ धातु आहे; पण ही सज्ञा त्यास वायून्या उत्पत्तीनतर येते. साराश, वर सागितलेली ईक्षणवृत्तीच आपल्या परम पदास सोडून सूक्ष्म प्रपचरूप झाली की, हिरण्यगर्भ होते. पण त्या अवस्थेतही ब्रह्मसत्ताच केवल भावनामय होऊन ससारोन्मुख होते. तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नसतो अर्थात् हिरण्य- गर्भ झाल्यावरही ब्रह्मसत्तेत काही अतर पडत नाही ती जशीच्या तशीच असते.. कारण त्या सत्तेचा स्वभावच तसा आहे. तर मग तिला जीवभाव कसा येतो ह्मणून ह्मणशील तर सागतो. त्या सत्तेलाच अनुसरून रज्जुसर्प-न्यायाने पुढे जीवभाव उद्भवतो. या जीवसत्तेच्या उत्पत्तीनतर लागलीच आकाश-सत्ता उद्भवते इतर भूतास अवकाश देणे, हे तिचे प्रयोजन असल्यामुळे ती शून्यप्राय असते. ती शब्दादि गुणाचे बीज आहे. सूर्यादि तेजाची उत्पत्ति झाल्यानतर प्राप्त होणाऱ्या आकाश, वायु, इत्यादि सज्ञास ही आकाश सत्ताच व्यक्त करिते. पुढे त्या जीवाचे ठायी अभिमान उत्पन्न होतो व त्याबरोबरच कालाचाही उद्भव होतो. हेच मुख्य जगस्थितीचे बीज होय. पण ही-आकाश, अहकार व काल-याची उत्पत्ति केवळ हिरण्यगर्भापासूनच होते, असे समजू मकोस. तर हिरण्यगर्भरूप परमात्मसत्तेपासून होते, असे समज. कारण ती परसत्ताच या सर्व विकारांचे कारण आहे.