पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ बृहद्योगवासिष्ठसार. त्यामुळेच त्याज्य आहे; हे सूक्ष्म आहे; हे स्थूल आहे; हे स्थिर आहे; हे अस्थिर आहे इत्यादि व्यावहारिक दृष्टि तुझ्या चित्तास व्याकुल करणार नाहींत. अरे दशरथाच्या लाडक्या रामा, एक आत्मा सत्य आहे, दुसरें काहीएक सत्य नाही, हे तू ध्यानात धर. त्याच्या ठायी हे जग कसे झाले हे तुला समजून सागावयाचे आहे, ते मी सागेनच. पण तू अगोदर हे परम तत्त्व विसरू नकोस, आत्म्यापासून ही सर्व भूते प्रकट झाली आहेत. तो ईश्वर कोठे द्र नाही. तो महात्मा या सर्व स्थूल-सूक्ष्म सृष्टीत समष्टि- व्यष्टिरूपाने व्यापून राहिला आहे. तोच उदय व लय या भावाने भ्रांतीने भासतो ११. सर्ग १२--या सर्गात जगाचा अत्यंत असंभव आहे, असे सुचविण्याकरिता आरो- पाचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-परम शात व पावन अशा या आत्मतत्त्वापासून हे कसे निर्माण झाले, ते ऐक. ज्याप्रमाणे प्रत्येक शरीरातील सुषुप्त ( ह्मणजे गाढ निद्रा-अस्थेतील ) आत्मरूप स्वप्नरूपाने विवर्त पावते त्याप्रमाणे ब्रह्म जग- द्रपाने विवर्त पावते. विवर्त ह्मणजे भ्रामक परिणाम. स्वप्न एका पुरुषाच्या वासनेमुळे झालेले असते. ह्मणून ते व्यवस्थित व चिरकाल रहाणारे, असे वाटत नाही. पण जग सर्व प्राण्याच्या वासनाचे कार्य आहे, ह्मणून हा प्रपच व्यवस्थित, स्थिर, कार्य-कारणभावयुक्त इत्यादि वाटतो. महाप्रलय झाला असता सर्व प्राणी त्या सद्रूप ब्रह्मामध्ये लीन होतात. निद्रासमयी आपण जीव जसे अविद्यामय होऊन कूटस्थ-आत्मरूपाने रहातों त्याचप्रमाणे प्रलयकालीन जीवाच्या लयाचा हा प्रकार आहे. अर्थात् सर्व जीवाच्या वासना त्या परमात्म्यामध्ये अविद्येच्या आश्रयाने असतात, असे ह्मणणे अगदी योग्य आहे, व त्यामुळे परमात्ममय झालेल्या सर्व जीवाच्या वासनाचे हे जगद्रूपी कार्य (विवर्त ) होतें. एवढ्याकरितांच त्या सद्प स्थानास सर्वात्मक ह्मणतात. असो, आता त्या प्रलयावस्थ ब्रह्मापासन हे सर्व कसे व कोणत्या क्रमाने होते ते सागतों, ऐक. ज्या- अर्थी हे विश्व त्रिकाली त्या परमात्म्याच्या केवल सत्तारूप आहे त्याअर्थी त्या आत्म्यामध्येच ते स्वतः चेत्यतेस प्राप्त झाल्यासारिखें होते. चेत्य झणजे चतनाचा विषय, व चेत्यतेस झणजे चेतनाच्या विषयतेस. अर्थात् ते चैतन्याचा विषय होते. त्या सद्रूप ब्रह्मामध्ये प्रथम अह अशी वृत्ति