पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ बृहयोगवासिष्ठसार, श्रीराम-ते मुळी उत्पन्नच होत नाहीत व त्यांची उत्पत्ति होणेही शक्य नाही. तेव्हा त्यांचे अस्तित्व किंवा नास्तित्व यांचा निर्णय कसा करिता येईल? श्रीवसिष्ठ--झाले तर, वाझेचा पुत्र, आकाशातील वन इत्यादि पदार्थ जसे कधी उत्पन्न झालेले नाहीत व ते उत्पन्न होणे शक्य नाही तसेच पारमार्थिक स्वसतेने रहित असलेले हे जग उत्पनही होत नाही व त्याचा नाशही होत नाही. श्रीराम–पण जगातील काही पदार्थ उत्पन्न होतात व नाश पाव- तात असे आपण प्रत्यक्ष पहातो आणि त्यावरून इतर सर्व पदार्थ उत्पत्ति-विनाशशील आहेत, असे अनुमान होते. पण वाझेचा पुत्र इत्यादि अत्यत असत् पदार्थ उत्पन्न झाल्याचे कोणास ठाऊक नाही. यास्तव जगाची त्या असत् पदाथोशी तुलना करणे योग्य नाही पण ज्याअर्थी शास्त्रात जगाला वध्यापुत्राचा दृष्टात दिलेला आढळतो त्याअर्थी मला असें वाटते की, वध्यापुत्र, आकाशवन इत्यादिकाच्या कल्पनेशी जगाची तुलना करावी. कारण ते शब्द ऐकताच आमच्या मनात एक प्रकारची कल्पना उद्भवते व ती उत्पत्ति-विनाशशील असते. तसेच हे जगही उत्पत्ति- विनाशशील आहे. श्रीवसिष्ठ--रामा, तूं ह्मणतोस ती कल्पना जर जगातच अंतर्भूत झाली नसती, ह्मणजे ती जगाहून जर निराळी असती, तर तिची उपमा जगास देतां आली असती. पण ज्याला उपमा द्यावयाची ते हे उपमेय दृश्य असे आहे की, त्याला त्याच्या बाहेरच्या वस्तूची उपमाच देतां येत नाही. पण उपमेय कोटीत येणाऱ्या एकाद्या वस्तूचीच त्यास उपमा देऊ लागल्यास तें उपमा-वचन अलकारशास्त्रांत सांगितलेल्या अनन्वय-अलंकाराचेच उदाहरण होईल. "गगनं गगनाकारं सागरः मागरोपमः । झणजे गगन गगनाकार आहे व समुद्र समुद्रासारिखा आहे" अनन्वय-अलंकाराचे प्रसिद्ध उदाहरण आहे. यांत गगनच गगनाची व समुद्र समुद्राची उपमा होऊ शकत नाही. त्या प्रमाणच या तुझ्या वाक्याची अवस्था होणार. यास्तव वंध्यापुत्राला जशी स्वसत्ता नाही तशाच जगालाही पृथक स्वसत्ता नाही. असाच या दृष्टांताचा अर्थ