पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११. १४३ असतां जे स्वरूप रहाते तेच महाप्रलयसमयी रहाणारे सद्रूप होय. द्रष्टा, दृश्य व दर्शन या त्रिपुटीत रहाणारे जे चैतन्य तेच ब्रह्म आहे. बुद्धिवृत्ति, विषयस्फुरण व अज्ञान याचे साक्षि ज्ञान जन्म-नाशरहित आहे व तेच परमात्म्याचे रूप होय. मायिक व्यवहार करण्यात गुतलेला तो ईश्वर पाषाणाप्रमाणे निश्चल असतो. वस्तुतः तो ज्ञानघन आहे. पण सर्व जगास अवकाश देणारे आकाश त्याच्यापासून होत असते. वेत्ता, वेद्य, वेदन या त्रिपुटीचे निमित्त तोच सच्चिदानदरूप परमात्मा आहे. पण तो स्वतः परिणाम पावून त्याचे निमित्त होत नाही. तर बुद्धयादि उपाधीत प्रति- बिंबित होऊन तो त्याचे निमित्त होतो. स्वप्न व जाग्रत् या दोन अव- स्थानी रहित असे जे महाचैतन्याचे स्वरूप ( ह्मणजे निजलेल्या पुरु- षाच्या आत्म्याचे जे स्वरूप ) तेच, या दृश्याचा प्रलय झाला असता, स्थावर जगम पदार्थातून अवशिष्ट रहाते. पाषाणादि स्थावर वस्तूचें अचलत्व हे स्वाभाविक स्वरूप आहे. पण तेच जर ज्ञान युक्त व मन, बुद्धि इत्यादिकानी रहित असते तर त्याची या परमात्म्याच्या रूपास उपमा देता आली असती. साराश ब्रह्मा, विष्णु, सूर्य, शंकर, इद्र इत्यादिकांची शाति होऊन सर्व उपाधींचा क्षय झाला असता हे एक, परम शिव, विकल्पशून्य, विश्वसगरहित व केवल चैतन्यरूप तत्त्व रहातें १०. सर्ग ११-जग अधिष्ठानसत्तेने प्रलय-समयींही सत् असते; पण स्वत च्या सत्तेने ते सृष्टि-कालीही असत् आहे, असे येथे सागतात.. श्रीराम-अहो गुरुवर्य, प्रलयसमयीं जग ब्रह्मरूप होते, हे आपले ह्मणणे मला समजले. पण चतुर्दश भुवनें; देव, दानव, मानव इत्यादि अनेक जातींचे अनेक प्राणी, पर्वत, नद्या, सागर, वृक्ष इत्यादि अनेक स्थावर पदार्थ इत्यादिकानी भरलेले हे अवाढव्य जग महाप्रलय झाला असता कोठे रहाते. ह्मणजे हा एवढा स्थूल प्रपच जातो कोठे ४ । श्रीवसिष्ठ--राघवा तुझ्या या प्रश्नाचे उत्तर मी मग देईन. पण अगोदर तू माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. वाझेचा पुत्र किवा आकाशांत दिसणारे वन अथवा मनुष्याचे शिग इत्यादि पदार्थ कोठून येतात; कसे असतात व कोठे जातात?