पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीवसिष्ट्र--बा प्रिय शिष्या, महा प्रलय झाला असतां जे सर्व कारणाचे कारण परब्रह्म अवशिष्ट रहाते त्याचेंच मी आता वर्णन करितो. चित्ताचा पूर्णपणे निरोध केल्यामुळे वृत्तींचा क्षय झाला असतां इंधन- ( काष्ठ )रहित अग्नीप्रमाणे चित्त अगदी उपराम पावते. ह्मणजे मन अमन होते. त्यावेळी जे अनिर्वचनीय, स्वप्रकाश, सद्रूप अवशिष्ट रहातें तच त्या वस्तूचे खर रूप आहे. चित्तवृत्तींचा क्षय झाल्यामुळे त्यावेळी दृश्य नसते. दृश्याच्या अभावीं द्रष्टयाचा अभाव होतो. अर्थात् त्रिपटीचा लय झल्यासारिखा होतो. या त्रिपुटीलयाचा जो साक्षी तेच सत् ब्रह्म होय. जीव हाच जिचा स्वभाव आहे अशी चिति (चैतन्य ) विषयापासून पराड्मुख झाली असता तिचे जे रूप अनु. भवास येते तेच परमात्म्याचे शुद्ध, शात व चिन्मात्र रूप होय. गाढ समाधि- समयीही त्या परात्पर देवाचेच साक्षात्स्वरूप अनुभवास येत असते. पण अभ्यास-अवस्थेत असलेल्या व योगारूढ न झालेल्या आरुरुक्षुस त्या स्वरूपाचा अनुभव येणे शक्य नसते. ह्मणून अभ्यास कालीच अनुभ- वास येणाऱ्या अवस्थाचा वर निर्देश केला आहे. आता योगारूढ पुरु- षाच्या अनुभवाचा निर्देश करून त्याचे स्वरूप सागतो. वायु, अग्नि इत्यादिकाचा अगास स्पर्श झाला तरी त्याच्या शीतोष्णादि धर्माचे ज्ञान न होता जीवत पुरुषाचे जे स्वरूप असते, तेच या परब्रह्माचे रूप आहे. आता जे योगाभ्यासी नाहीत त्यास या रूपाचा अनुभव कसा घेता येईल ते सागतो. शात चित्त करून बराच वेळ बसावे. किवा हात- रुणावर पडावे. ह्मणजे झोप लागण्यापूर्वी एक दोन क्षण त्या स्वरूपाचे भान होते. कारण स्वप्नशून्य, डास, ढेकूण इत्यादिकाकडून विच्छिन्न न होणारी व चित्त-जाड्यरहित अशी चित्तविश्रांति झणजे एकप्रकारची समाधीच होय. झोप लागता लागता व चागले जागे होण्यापूर्वी केव्हां केव्हां या अवस्थेचा अनुभव येतो. केव्हां केव्हा ह्मणण्याचे कारण असें की, प्रायः त्यावेळी स्वप्ने पडतात. असो, अशा ह्या अवस्थेचा दीर्घकाल अभ्यास करावा. हणजे त्यावेळी त्या परमात्म्याचे स्वरूप साक्षात् अनुभ- नास येईल. नाकाशाचे शून्यत्व, वायूचे अतर्बहिःपूर्णत्व, व शिळेचे घनत्व हेच त्या निर्विषय चिदाकाश पर ब्रह्माचे रूप आहे. जितके झणून जिवंत प्राणी आहेत त्यांनी चित्त व चित्ताचे विषय यांचा परित्याग केला