पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १०. अर्थात् जीवाचा असंभव आहे. त्यामुळे मिरची खाणारा नसला ह्मणजे तिचे तिखटपण जसें मिरचीत रहातें याप्रमाणे जीव नसल्यामुळे जग आपल्या अधिष्ठानांत रहाते. झणजे तें ब्रह्म एकरस होते; आणि एकरस झाल्यामुळेच चित्त, चित्ताचा विषय इत्यादि नाना- रसता, व्युत्थित दशेत जरी अनुभवास येत असली तरा, मिथ्या ठरते. पण त्या नानारसतेचे अधिष्ठान (ब्रह्म ) सत्य असल्यामुळे मांस ती सत्य असल्यासारखी भासते. (एकरस झणजे एक-स्वभाब, एकरूप, व नाना रस झणजे अनेक-स्वभाव; अनेकाकार.) महाप्रलय- समयीं जग एकरस झाल्यामुळे जीवाची उपाधि नाहीशी होते. ती नाहीशी झाल्यामुळे औपाधिक (उपाधीमुळे प्राप्त होणारा ) जीवभाव नष्ट होतो. तेव्हा अवशिष्ट रहाणाऱ्या सत्-तत्त्वास जीव कसे ह्मणतां येईल ? शिवाय जीवास कोणी अणु-परिमाण मानितात, कोणी मध्यम- परिमाण समजतात. तो पुण्य, पाप इत्यादिकानीं दूषित झालेला अस- त्यामुळे अशुद्ध असतो, व आपल्याच चैतन्याभासाने प्रकाशित होणान्या विषयाचा भोग घेतो. पण सत्-तत्त्व त्याच्या अगदी विपरीत स्वभावाचे असते. ते अणहूनही अणु, अति शुद्ध, अति शात व आकाशाहनही अति सूक्ष्म, दिशा, काल इत्यादिकाच्या योगाने परिच्छिन्न न होणारे. सर्वव्यापी, अनादि व अनत आणि विषयशून्य आहे. तस्मात् ज्याला विषयास व्यक्त करणे, या लक्षणाचे चैतन्यही ह्मणता येणार नाही. त्यास अनुकूल व प्रतिकूल विषयाचा भोक्ता जीव कसे झ- णता येईल ? राघवा, याच न्यायाने त्या सद्रूप ब्रह्मास बुद्धि, मन इत्यादिकातील कोणतीही संज्ञा देतां येणे शक्य नाही, असें तू जाण. आझी तर त्याला, पूर्वी सागितल्याप्रमाणे, अनिर्वचनीय समजतो. कारण ते पूर्ण. अजर, अव्यय, शात व आकाशाहूनही अधिक शून्य आहे, असा आमास अनुभव येतो. श्रीराम-महाराज, आपल्या या युक्तिपूर्ण उत्तराने माझे पूर्ण समाधान झाले. आतां समाहित (शांत, वृत्तिरहित, एकाग्र ) चित्तामध्ये ज्या रूपाने त्या चिद्रूप सत्तत्त्वाचे अपरोक्ष ज्ञान होणे शक्य आहे तें त्याचे स्वरूप मला सांगा. मणजे मी त्याचा अभ्यास करीन.