Jump to content

पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० बृहद्योगवासिष्ठसार. पुप्त किंवा तुर्य अवस्थेत असते. योग्याच्या एकदर सात भूमिका असतात. त्याचे वर्णन याच प्रकरणांत पुढे येईल. त्यांतील पहिल्या पांच भूमींस सुषुप्त व पुढच्या दोन भूमिकांस तुर्य झणतात. त्यामुळे व्यवहार करणारा योगीही सुषुप्तात्मा व शातचित्त असतो व सर्व सस्काराचे जणु काय सपुष्टच असें ब्रह्म सर्व आभासशून्य असते. पण साकार जग ब्रह्मरूप निराकार कसे होऊन रहाते, ह्मणून ह्मण- शील तर सागतो. एकाद्या अगाध जलाने भरलेल्या सरोवराकडे पहावे. वारा जोराने चालू लागला की त्यांत अनेक आकाराच्या लहान मोठ्या लाटा दिसतात. पण वारा अगदी वाहीनासा झाला की ते जल संथ (निश्चल ) होऊन रहाते. ह्मणजे त्या पूर्वीच्या अनेक-आकाराच्या लहरी त्या एकाकार जलात लीन होतात, त्या एकाकार जलरूप होऊन रहातात. त्याचप्रमाणे साकार जग निराकार ब्रह्मरूप होऊन रहाते, असे तू समज. ___ असो; आता प्रलयसमयीं अवशिष्ट रहाणारे सत् जीवही कसे नव्हे तें ऐक. जग ही जीवाची उपाधि आहे. पण ते (जग) आपल्या कारणाहून भिन्न नाही, हे वर सागितलेच आहे. ब्रह्म पूर्ण आहे. यास्तव त्याच्यापासून औपाधिक भेदाने जीवरूप होऊन व्यक्त होणारे तत्त्वही पूर्ण असते. पूर्ण वस्तु निराकारच असली पाहिजे. कारण वस्त्र, पुस्तक इत्यादि साकार वस्तु पूर्ण नसतात. तर त्या परिच्छिन्न, (मर्यादित, आपल्या आकाराप्रमाणे थोड्या फार अवकाशास व्यापणाऱ्या) असतात, हे जगप्रसिद्ध आहे. ब्रह्म व जीव याचा गाय व घोडा याच्याप्रमाणे स्वाभाविक भेद नाही. तर तो महाकाश व घटातील आकाश याच्याप्रमाणे औपाधिक भेद आहे, हेही सुज्ञास ठाऊक आहेच. ___ आता कदाचित् तू ह्मणशील की, ब्रह्म जर वस्तुतः पूर्ण आहे तर तें विश्वरूपाने व जीवरूपाने का भासते ? तर त्याचे उत्तर असे अनेक योनीतून ( जन्म-मरणद्वारा ) हिंडत असता क्रमाने ब्राह्मणादि अधिकारी शरीरास प्राप्त होऊन व स्वतत्त्वाचा साक्षात्कार करून घेऊन, अज्ञानाचा नाश करावा व खात्मलाभ साधावा ह्मणून ते (ब्रह्म) जग व जीव या भावाने परिणाम पाबलें आहे. अर्थात् त्याचा हा सर्व खेळ आहे. ह्मणूनच आधी 1 जगास उत्पन्न न झालेले समजतो. कारण सामान्य जन स्याका पन झालेला किंवा उत्पन्न होणारे झणून समजतात ते हे ब्रह्मच आहे.