पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १०. १३९ द्रादि जलाशयाच्या पोटात मोठे मोठे डोगर, झाडे इत्यादि असतात. येथे जल आधार व पर्वतादि पदार्थ आधेय असतात. पण त्यांचा स्वभावही एकसारखा नसतो. याच न्यायाने महाप्रलयसमयी ब्रह्मामध्ये रहाणारे जग ब्रह्माच्या स्वभावाचे असू शकणार नाही. कारण त्याच्यामध्ये आधार- आधेयभाव आहे. तेव्हा बेलफळ व त्याच्या आतील भाग याच्याप्रमाणे ब्रह्म व त्यात लीन झालेले जग याचे ऐक्य आहे, असे कसे ह्मणता येईल ? पण हा तुझा आक्षेप बरोबर नाही. कारण तू जे वर दोन दृष्टात दिले आहेस त्यातील आधार व आधेय ही दोन्हीं साकार आहेत, व निराकार ब्रह्मामध्ये असणारे जग, लीन झालेले असल्यामुळे, निराकार आहे. यास्तव ते येथे लागू पडत नाहीत, तस्मात् या प्रसिद्ध आकाशाहूनही सूक्ष्म व निर्मल असणारे चिदाकाश जशा प्रकारचे असते तशाच प्रकारचे त्यात लीन झालेले जग असते. अर्थात् जग या शब्दास व त्याच्या प्रसिद्ध अर्थास ते जरी पात्र असले तरी त्याचा स्वभाव आधाराच्या स्वभा- हून भिन्न नसतो. ___ आता ते सत् चैतन्य कसे नव्हे ते सागतो. लाल किंवा हिरवी मिरची तोडात घालून व चावून खाऊ लागल्याशिवाय तिचे तिखटपण समजत नाही. त्याचप्रमाणे दृश्यावाचून चिदाकाशाचे चैतन्य व्यक्त होत नाही. ह्मणूनच कूटस्थाचे ठायी चित, आत्मा इत्यादि शब्द लक्षणेने प्रवृत्त होतात. मुख्य वृत्तीने प्रवृत्त होत नाहीत. ह्मणजे कूटस्थास चैतन्य ह्मणणे हा गौण शब्दव्यवहार आहे. खरोखर पहाता त्यास चैतन्यही झणता येत नाही. कारण वर मटल्याप्रमाणे तो दृश्याच्या अपेक्षेने चिदाकाशाचे ठायी येणारा धर्म आहे. ___ असो; जगाचा लय झाला असता दृश्याचा अभाव झाल्यामुळे चैत- न्याची ज्याप्रमाणे निवृत्ति होते त्याचप्रमाणे जगाच्या जगत्वाचीई निवृत्ति होते. कारण जग हा धर्मीच लीन झाल्यावर जगत्व त्याचा धर्म कसा रहाणार ? धर्मी ह्मणजे द्रव्य व धर्म ह्मणजे त्य आश्रयाने रहाणारा गुण. 'पांढरे वस्त्र' या वाक्यात वस्त्र हे द्रव्य त्याच्या आश्रयाने रहाणारा शुभ्र वर्ण हा त्याचा धर्म । सारांश प्रलयसमयीं सर्वांचा लय झाल्यामुळे रूपादि बाह्य व णादि आतर भाव ब्रह्ममय झालेले असतात. यास्तव त्यावेळी हे वि