पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३८ बृहद्योगवासिष्ठसार. यास्तव प्रकाशाच्या अभावी त्याचाही अभाव होतो. आता महा- प्रलयानतर रहाणारे तत्त्व स्वयप्रकाश असते याविषयी प्रमाण काय ह्मणून ह्मणशील तर, स्वानुभवच याविषयी प्रमाण आहे. आपल्या या हृदयांत जो हा देव बसला आहे त्यास जाणणारा दुसरा कोणी नाही. तो आपणच आपल्याला जाणत असतो. ज्याचे ज्ञान मन, इद्रिये इत्यादि साधनांच्या योगाने होत असते त्यास परप्रकाश ह्मणतात, व ज्याच्या ज्ञानास दुसऱ्या साधनाची गरज नसते, तर तो आपणच आपणास दीपाप्रमाणे प्रकाशित करीत असतो त्यास स्वप्रकाश ह्मणतात. दगड, लाकुड इत्यादि जड पदार्थास दीप प्रकाशित करितो. त्याच्या प्रकाशा- वाचून ते प्रकाशित होत नाहीत. यास्तव ते जड किवा परप्रकाश असतात. पण दीपाच्या ज्योतीला ती ज्योतीच प्रकाशित करीत असते. झणून ती स्वप्रकाश आहे. सर्व स्थूल व सूक्ष्म कार्याचा नाश झाला तरी सर्वाधार ब्रह्माचा नाश होत नाही. ब्रह्मच आत्मा आहे, व तो स्वानुभवसिद्ध आहे. यास्तव प्रलयसमयी रहाणारे तत्त्व स्वयप्रकाश असते असे ह्मणण्यास काही प्रत्यवाय नाही. साराश, ते अजर पद प्रकाश व तम या दोन्ही गुणानी रहित आहे. ते जगरूपी धनास साठवून ठेवावयाचे भाडागार अति स्वच्छ आहे, यात काही शका नाही. बेलफळ व त्याच्या आतील भाग यांत जसे काही अंतर नाही त्याचप्रमाणे ब्रह्म व जग यामध्ये काही भेद नाही. पाण्यातील लाटेप्रमाणे किवा मृत्तिकेतील बोळक्याप्रमाणे ज्याच्यामध्ये जगाची सत्ता आहे त्याला शून्य कसे ह्मणता येईल ? बेलफळाचा दृष्टात दिल्यावर मला-ते शन्य नसते-अशाविषयी हे दोन दृष्टात आठवले व त्यामुळे मी त्याचा येथे प्रसग नसताही उल्लेख केला आहे. ___ पण वरील बेलफळाचा दृष्टात ऐकून कदाचित् तू ह्मणशील की, आधार व आधेय याचा स्वभाव एकसारखा नसतो. (कारण एकाया दौतींत आम्ही शाई भरून ठेवितो. तेव्हा दौत आधार व शाई आधेय असते. कारण आधेय झणजे आधाराने रहाणारी वस्तु. दौतीच्या आधा- राने शाई रहाते. ह्मणून दौत आधार व शाई आधेय आहे. पण त्याचा स्वभाव एकसारखा नसतो.) कारण त्यांतील एक पदार्थ घन (घट्ट ) असतो व दुसरा द्रवरूप ( पातळ ) असतो. त्याचप्रमाणे समु-