पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १०. १३७ त्याच न्यायाने झाले आहे व ते त्यामुळे ब्रह्मरूप आहे, असे मानण्यास योग्य कर्ता, देश, काल, साधने इत्यादि सामग्री दिसत नाही. झणून वादी विवाद कारतात. त्यांना हा अपूव सिद्धात ऐकून मोहच पडतो. यास्तव, स्तमावरील चित्राचा जो हा आम्ही दृष्टात दिला आहे तो एकदेशी समजावा. विकार सर्वकाल कारणरूपाने सत् कसा असतो एवढे सम- जाविण्याकरिताच त्याचा येथे उपयोग केला आहे. हे जग वस्तुतः ब्रह्माहून भिन्न सत्तेने युक्त नसते. यास्तव तें प्रलयसमयींही सब्रह्मस्वरूपी असते. शून्यता व अशून्यता परस्पर सापेक्ष असतात. ह्मणजे चागला या शब्दाच्या अपेक्षेने जसा वाईट हा शब्द प्रवृत्त होतो व वाईट या शब्दाच्या अपेक्षेने चागला प्रवृत्त होतो त्याप्रमाणे शून्याच्या अपेक्षेने अ- शून्य व अशून्याच्या अपेक्षेने शून्य, असे ह्मणता येते. पण असले पर- स्पर सापेक्ष पदार्थ त्रिकाली रहाणारे नसतात. कारण यातील एक नाहीसा झाला की दुसराही आपोआप नाहीसा होतो. उदाहरणार्थ-असे समज की, जगातून चागला हा शब्द व त्याचा अर्थ निघून गेला तर वाईट या शब्दाचा व त्याच्या अर्थाचा उपयोग कोणाला तरी करिता येईल का ? नाही त्याचप्रमाणे शून्यता व अशून्यता याची स्थिति आहे. त्यातील एकही तत्त्व नव्हे. तर ती दोन्ही काल्पनिक आहेत. ___ असो; येथवर मी तुला-महाप्रलयानतर अवशिष्ट रहाणारे तत्त्व शून्य कसे नसते ते सागितले. आता ते प्रकाश कसे नसते ते सागतो. येथील प्रकाश या शब्दाचा, भूतप्रकाश असा अर्थ समजल्यास तो ब्रह्माच्या ठिकाणी असणे सभवत नाही. कारण भूतप्रकाश झणजे पंचमहाभूतातील तेज या नावाच्या तिसऱ्या भूताचा प्रकाश. तो निर्गुण, निरवयव व त्रिविधभेदशून्य ब्रह्माचे ठायी असू शकत नाही. सूर्य, चद्र, नक्षत्रे, अग्नि इत्यादि भौतिक तेजानी ते प्रकाशित होत नाही, असें उप- निषदांतही म्हटले आहे. यास्तव ते तत्त्व प्रकाशही नव्हे व ते भास्वरही नसते, असें तू समज. आतां ते तमही कसे नव्हे ते पहा. वर सांगितलेल्या भौतिक प्रकाशाच्या अभावाला तम, असें ह्मणतात. पण हे सद्ब्रह्म स्वयं- प्रकाश असल्यामुळे प्रलयसमयीं तम असणे शक्य नाही. शिवाय तम हा शब्द प्रकाशशब्दाच्या अपेक्षेनें उपयोगात आलेला आहे.