पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ बृहद्योगवासिष्ठसार. शून्य कसें नाही ते मी अगोदर सांगतो. एकाद्या स्तभावर चित्र खोदा- वयाचे असल्यास ते खोदावयाच्या पूर्वी त्या स्तंभावर अव्यक्तरूपाने जसें असते तसेच जग सत्-सज्ञक तत्त्वावर असते. ह्मणून जगाच्या त्या प्रागभावास अत्यंताभाव किवा शून्य ह्मणता येत नाही. पण स्तंभावर तरी चित्र खोदण्यापूर्वी असते कोठे? ह्मणून ह्मणशील तर सांगतो. जी वस्तु जिच्या सत्तेनेच सत्तावान् होते ती तिच्या ठायीं ( ह्मणजे सत्ता देणाऱ्या वस्तूच्या ठायीं) त्रिकाली असते, असा न्याय आहे. उदाहरणार्थ पाण्याची लाट ही वस्तु घेऊ या. ती पाण्याच्या सत्तेनेच सत्तावाली होते. झणजे पाण्याच्या अस्तित्वावर अथवा नास्तित्वावर तिचे अस्तित्व अथवा नास्तित्व अवलबून असते. ह्मणून लाट त्रिकाली झणजे उत्पत्तीपूर्वी, उत्पत्तीनतर व नाशानतर पाणी या आपल्या कारणरूपाने असते. लाट हे तिचे व्यक्त स्वरूप आहे, व तें उत्पत्तीनतर नाशापर्यतच असते, हे उघड आहे. पण त्यामुळे तें बीजरूपानेही पूर्वी नव्हते किवा मागून नसेल, असे ह्मणता येत नाही. कारण उत्पत्तीपूर्वी लाट पाण्यामध्ये जर मुळीच नसती तर ती कधीच उद्भवली नसती. बीजावाचून अकुर किवा कारणावाचून कार्य कधी होत नाही. एवढ्याकरिताच आह्मी वैदिक कार- णाची एक प्रकारची रचना ह्मणजेच कार्य व त्यामुळेच कार्य आणि कारण याचे ऐक्य मानीत असतो. या न्यायाने खोदावयाचे चित्रही बीजरूपाने स्तंभावर असते व तेच पुढे खोदल्यावर व्यक्त होत, असे ठरते. हे विश्वही सत्-मध्ये तसेंच अव्यक्त असते. ह्मणून त्या तत्त्वास शून्य टंगता येत नाही. हा जगत्संज्ञक प्रपच वस्तुतः सत्य असो की, असत्य असो. पण तो जेथें असतो ते त्याचे अधिष्ठान शून्य नाही. संथ जलामध्ये लाटा नाहीत, असेही ह्मणवत नाही व आहेत, असेंही ह्मणता यत नाही. त्याप्रमाणे ब्रह्माचे ठायीं हे जग शून्याशून्यतेस ह्मणजे अनिर्वचनीयत्वास प्राप्त झाले आहे. पण असे जर आहे तर वादी याच्या- विषयांच मात्र वाद का करितात? ह्मणून विचारशील तर सांगतो. स्तंभा- वर चित्र काढावयाचे असल्यास स्तभ हा योग्य आधार, चित्र खोदणारा कारागीर, खोदण्याची साधनें, योग्य काल, देश इत्यादि प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे स्तंभावरील चित्राविषयी कोणालाही सशय घेण्यास अवकाश रहात नाही; पण अनंत व निरवयव ब्रह्माचे ठायीं हे जग