पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १०. १३५ प्रकाश साक्षीच्या अस्तित्वामुळेच चित्ताच्या सर्व क्रिया चालतात. समुद्रापासून जसा लाटाचा उद्भव होत असतो त्याप्रमाणे हे वस्त्र, हे पुस्तक, हे लाकुड इत्यादि भनेक पदार्थाच्या पक्ति त्याच्या पासूनच उद्भ- वतात. सुवर्णाचे जसे-कडीं, आगठ्या, गोट, पाटल्या, सरी, कुडलें इत्यादि-अनेक पदार्थ होतात त्याचप्रमाणे या परमात्म्यापासून शेकडों पदार्थाचे भ्रम होतात. रामा, तू त्या स्वहृदयस्थ देवास जाणतोस, मीहि जाणतो व हे सर्व लोकही जाणतात. कारण तो अहं या रूपाने सर्व शरीरांत प्रकाशमान होत असतो. ह्मणून तो एक आहे. पण अनात्म पदार्थ अशारीतीने कोणाच्याही अनुभवास येत नाहीत. तर ते सर्व स्वभिन्न ( माझ्याहून निराळे ) आहेत असेच प्रत्येकास वाटत असते. __ असो, कालाचे विकार, दृश्य जगाच्या ठिकाणी असलेली दृश्यता व इष्ट वस्तूची प्राप्ति व्हावी, अनिष्टाचा परिहार व्हावा इत्यादि मानसिक विकल्प त्याच्यापासूनच उद्भवतात. देह, प्राण व कर्मेद्रिये याच्या क्रिया, ज्ञानेद्रियांचे रूपादि विषय आणि अतःकरणस्थ जीवत्व यास जाणणा- राही तोच व ज्याच्या द्वारा त्यास जाणतो ते वृत्तिज्ञानही तोच आहे. तात्पर्य द्रष्टा जीव, दृश्य विषय व दर्शन वृत्तिज्ञान या सर्वाचा ह्मणजे त्रिपुटीचा तो साक्षी आहे त्यास एकाग्र मनाने त्रिपुटीहून भिन्न करून पहा. तेंच अज, अजर, अनादि, शाश्वत, नित्य, शिव, निर्मल, जगद्वद्य, अनिद्य, सर्वविकारशून्य, सर्व कारणाचेही कारण, सर्वव्यापि, स्वयप्रकाश, व निर्विषय ब्रह्म आहे ९. सर्ग १०-पूर्वाक्त ब्रह्मलक्षणावर येणाऱ्या विरोधाचे निरसन या सर्गात केले आहे. श्रीराम-गुरुराज, महाप्रलयसमयी सर्व दृश्याचा नाश झाल्यावर जे काही अवशिष्ट रहाते ते आकाररहित असते, हे आपले ह्मणणे मला मान्य आहे पण ते शून्यही नाही, प्रकाशहीनाही, तमोरूपही नव्हे; भास्वरही नव्हे, चिद्रूप नव्हे, जीव नव्हे, बुद्धितत्त्व नव्हे, मन नव्हे; इत्यादि जे आपले झणणे आहे ते मला घोटाळ्यात घालितें. यास्तव त्याची मला चागली फोड करून सांगा. श्रीवसिष्ठ-रामा, तुझा हा प्रश्न व्यर्थ आहे. माझ्या बोलण्याचा अभिप्राय न समजल्यामुळे तू असे विचारीत आहेस. यास्तव मी आता त्याचा निर्णय सागतो. महाप्रलय झाल्यानंतर अवशिष्ट रहाणारें सत्