पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३३ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९. कल्यामध्ये शुद्ध सोन्यावाचून कडें म्हणून आणखी काही दिसतच नाही. जलतरगामध्ये मला जलावाचून दुसरे कांहीं आढळत नाही. सारांश स्पंदत्व जसें वायूहून निराळे नाही; शून्यत्व आकाशाहून भिन्न नाही व प्रकाश तेजाहून पृथक् नाही त्याप्रमाणे जग ब्रह्माहून निराळे नाही. तर ते ब्रह्मच आहे.

  • श्रीराम-पण महाराज, हे परमतत्त्व माझ्या अनुभवास कसे येईल,

ते सागा. श्रीवसिष्ठ-रामा, दीर्घ कालापासून प्रवृत्त झालेले व अति रूढ झालेले हे मिथ्या अज्ञान झटदिशी नाहीसे होणे शक्य नाही. यास्तव दीर्घ अभ्यास व युक्तियुक्त विचार याच्या योगाने हा जगम कसा नाहीसा होतो ते मी तुला सागतो. मी आता अगोदर तुला एक अपूर्व वार्ता सागतो, ती ऐक. म्हणजे तुला पुष्कळ बोध होईल. देव, गधवे, मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, पाषाण इत्यादि रूप जेवढे म्हणून हे चराचर जग दिसत आहे ते सर्व, रुद्रादिकासही गुप्त करून सोडणाऱ्या महाप्रलयात, नाहीसे होते. ते कोठे जाते याचा काही पत्ता लागत नाही. पण त्यावेळी स्तिमित, गंभीर, तेजही नव्हे व तमही नव्हे असे व नामरूपरहित असे काही अवशिष्ट रहाते. त्याला शून्य ह्मणता येत नाही, ते दृश्य नाहीं व दर्शनही नव्हे, भूते व पदार्थ याचा हा एक गोळा आहे, असेही म्हणवत नाही; पण ते अनत, पूर्ण, केवल चित् व सर्व कल्पनारहित असे सत् असते. त्या सद्रूप आत्मतत्त्वामध्ये हा जगम होतो. अध्यारोप- दृष्टीने तो परमात्माच हे सर्व आहे; पण पारमार्थिक दृष्टया म्हणजे अपवाद दृष्टया तो हे नव्हे. त्याला कर्ण नाहीत, पण शब्द श्रवण करण्या शक्ति त्याच्यामध्ये आहे. तसेंच तो जिहारहित असूनही घेतो, घ्राणेद्रियावाचून वास घेतो; त्वगिंद्रयावाचून स्पर्श जाण नेत्रांवाचूनच पहातो. तोच व्यक्त व अन्यक्त आहे. त्याच्या स्वर प्रकाशाच्या योगानेच हे जगचित्र दिसते. त्या प्रभूचे दुसरे काही नसते. पण तरगाचा समूह हे जसे जलाचे कार्य तसे जग हे त्या भआहे. सामान्यतः सर्वतः प्रकाशित होणारा तो देव या हृदयांत ! प्रकाशित होत रहातो. त्या चिन्मात्रदीपाच्या प्रकाशानेच हे भासत असते. त्याच्या वांचून हे सूर्यादि प्रकाशही अंधका