पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ बृहयोगवासिष्ठसार. तो जरी शरीरावयवसैपन असला तरी त्याच्या दृष्टीने तदहित असतो. मात्मा पूर्वीच प्राप्त आहे. यास्तव तो विषादि अनिष्ट पदार्थाप्रमाणे हेय (स्याज्य) किंवा द्रव्यादि इष्ट पदार्थीप्रमाणे उपादेय (ग्राह्य ) नाही; त्याच प्रमाणे जग त्याध्याठायी आरोपित असल्यामुळे तें मिथ्या आहे, असे त्यास निश्चयपूर्वक कळलेले असते. त्यामुळे तो व्यवहार करीत असतांनाही मति शांत असतो शेवटीं प्रारब्ध कमीचा क्षय झाल्यामुळे देह कालवश झाला असता तो धन्य पुरुष हे जीवन्मुक्त पद सोडून विदेहमुक्त-अवस्थेस प्राप्त होतो. त्यानतर त्याची कधी वृद्धि होत नाही व क्षय होत नाही; तो शात होत नाही; तो व्यक्त होऊन पुनः अव्यक्त होत नाही; तो कोठे दूर जातो, असें नाहीं; तो मी, तू, तो इत्यादि व्यवहारास योग्य नसतो; तो सूर्यरूप होऊन सास ताप देतो; विष्णुरूपाने त्रिभुवनाचे पालन करितो; रुद्र होऊन सर्वांचा संहार करितो; ब्रह्मा होऊन सृष्टीस निर्माण करितो; आकाश होऊन वायूस धारण करितो; मेरुपर्वत होऊन ऋषि, देव इत्यादिकाचे वसति-स्थान होतो, भूमिरूपाने या अखंडित लोक- स्थितीचे तो धारण करितो, तृण, वृक्ष इत्यादिरूप होऊन पुष्पे व फळे देतो; मेघरूपाने दृष्टि करितो, विद्युत् होऊन चकचकतो; चद्र होऊन अमृताचा वर्षाव करितो; हालाहल विष होऊन प्राण्यास मारतो; तेजो- रूप होऊन दश दिशांस प्रकाशित करितो व अंधकार होऊन त्यांस आच्छादित करून सोडितो. साराश तो स्वय पर-ब्रह्म झाल्यामुळे सर्व चराचर सृष्टि ही त्याची विभूति होते. अशा अवस्थेस प्राप्त होणे हीच मुक्ति, किंवा निर्वाण होय. श्रीराम-पण, सद्गुरो, आपल्या ह्मणण्याप्रमाणे विदेहमुक्त जर त्रैलो- क्यरूप होतात, असे समजले तर ते उत्पन्न झाले, असेंच झटले पाहिजे. मग त्याची मुक्तता कोठे राहिली ? । श्रीवसिष्ठ-होय तूं म्हणतोस ते खरे. पण त्रैलोक्य म्हणून जर काही सस्य वस्तु असती तर तसे झाले असते. पण ज्याच्या ठायीं त्रैलोक्य या शब्दाचा अर्थच संभवत नाहीं तें ब्रह्म त्रैलोक्य झाले, अशी भावनाच कशी होणार ? एकरूप, शांत, स्वयंज्योति व आकाशाप्रमाणे निर्मल ब्रह्मच जग आहे. कारण त्यांत तरी ब्रह्माच्या सत्तेवाचून दुसरे काय आहे ? यास्तव त्याच्या सत्तेचा बाध झाला असता सर्व ब्रह्ममय होते. मला तर सुवर्णाच्य