पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ९. १३१ श्रीवसिष्ठ-शास्त्रविहित व्यवहार करीत असतांनाही ज्याला हे दृश्य विश्व अस्त पावल्याप्रमाणे, शून्य असल्यासारिखे वाटतें तो जीवन्मुक्त होय. म्हणजे तो जरी जगातील वस्तूशी व्यवहार करीत असला तरी परमार्थ दृष्टीने हे जग मिथ्या आहे, ते मुळीं नाहींच, असे त्यास वाटत असल्यामुळे आरशातील चित्राप्रमाणे भासते. तो केवळ ज्ञाननिष्ठ असतो. त्यामुळे " मी हे अमुक करितो" असें त्यास वाटत नाही. तर तो जाग्रतीतही निजलेल्या पुरुषाप्रमाणे अह-ममभावरहित असतो. सुख झालें असता त्याचे मुख प्रसन्न होत नाही व दुःख झाले असता त्याची मुख- प्रभा मावळत नाही, तर जी अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिति प्राप्त होईल त्यात तो सतोषाने रहातो. तो निर्विकार आत्म्याचे ठायीं गाढ झोपी गेलेल्या पुरुषाप्रमाणे रहातो. त्याची अविद्यालक्षण निद्रा नाहीशी झालेली अस- ल्यामुळे तो स्वात्म्याचे ठायीं सतत जागत असतो. त्याला इतर प्राण्याप्रमाणे जाग्रत् व स्वप्न या अवस्था कधीही प्राप्त होत नाहीत. कारण प्राणी ज्या अवस्थेत बाह्य इद्रियाच्या योगाने विषयाचे ग्रहण करितो त्या अवस्थेस जामत् ह्मणतात व स्वप्न-अवस्था जाग्रद्वासनेमुळे उद्भवते. पण जीवन्मत्त बाह्य इद्रियानी विषयग्रहण कधीच करीत नाही व त्यास त्याची वासनाही नसते. त्यामुळे त्याला या दोन्ही अवस्था नसतात. राग, द्वेष, भय इत्यादि विकारास साजेल असे जरी तो एकाद्या नटा- प्रमाणे वर्तन करीत असला तरी चित्तात अगदी निर्मल असतो. झणजे त्याने बाहेरून तृष्णा, द्वेष इत्यादि विकाराचा कितीही जरी आव आणिला तरी त्याचा चित्तात गधही नसतो तर तो त्यावेळीही आपल्या नित्य व आनदरूप स्वरूपातच स्थित असतो. मी हे अमुक करीत आहे. असें तो कधीही ह्मणत नाही व तसे त्याला वाटतही नाही. त्याच्या बुद्धीला कार्याचा अथवा अकार्याचा कधीही लेप होत नाही. तो आत्मज्ञ जीवन्मुक्त, चिद्रूप आत्म्याच्या साक्षात्काराने जगाचा प्रलय (बाध ) होतो व त्याच्या अज्ञानामुळेच जगाचा भ्रम होतो, असे स्वानुभवाने जाणत असतो. त्याला कोणी भीत नाही व तो कोणाला भीत नाही. कारण हर्ष, भय, क्रोध इत्यादि अज्ञानजन्य विकारापासून तो मुक्त असले तो सचेतन असतो. पण त्याच्या मनाचा लय झालेला असला हा ससाए सन्य आहे, याची भावना लीन होते. दुसऱ्यांची