पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२९ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ८. नाही. तर हे जे काही दिसत आहे तें सर्व ब्रह्म आहे. हाच सिद्धांत मी तुला पुढे अधिक चांगल्या रीतीने सांगेन. बा राजसुता, आत्मज्ञ पुरुष में युक्तिपूर्वक सांगत असतात त्याची अवहेलना करणे अयोग्य आहे. कारण जो युक्तियुक्त वचनही न ऐकतां उगीच आग्रह धरून बसतो तो अन आहे, असे सुज्ञ समजतात ७. सर्ग८-त्या तत्त्वाचे ज्ञान या शास्त्रासारिख्या सच्छास्त्राच्या अभ्यासानेच होणे __ शक्य आहे, असें वर्णन करितात. श्रीराम-दिसणारे हे सर्व ब्रह्मच आहे, हे तत्त्व कोणत्या युक्तीने समजतें? श्रीवसिष्ठ--लक्ष्मणाप्रजा, जगत् या नावाची ही महामारी दीर्घ- कालापासून रूढ झाली आहे. ही मिथ्या ज्ञान व अविचार याच्या योगानेच उद्भवलेली असल्यामुळे ज्ञानावाचून तिचा क्षय होत नाही. तुला बोध व्हावा एवढ्यासाठी मी ज्या कथा सागणार आहे, त्या जर तू लक्ष्य देऊन ऐकशील तर,बा साधो, तू ज्ञानी व मुक्त होशील. पण तसे न करिता उद्विग्न होऊन जर तू मध्येच उठून जाशील तर सच्छास्त्र-श्रवणास अयोग्य मसलेल्या पशु-पक्ष्याप्रमाणे तुला काही लाभ होणार नाही. जो ज्याची इच्छा करितो व त्याकरिता प्रयत्न करितो त्यास ते अवश्य प्राप्त होते. पण थोडासा प्रयत्न करून जर तो कटाळला व त्याने प्रयत्न सोडिला तर त्यास इष्ट वस्तूचा लाभ होत नाही. यास्तव इष्ट-प्राप्तिपर्यंत प्रयत्न केला पाहिजे. रामा, तुझी अवस्था तर अगदीच निराळी आहे. तूं जर या दोन ( साधुसगम व सच्छास्त्र) साधनाचा आश्रय केलास तर तला - परमपद थोड्याशा दिवसातच प्राप्त होईल. झणजे तुला काही महिने प्रयत्न करण्याचीही आवश्यकता नाही. शराम--असे जर असेल तर, महाराज, मला एकादें उत्तम शास्त्र सांगा: झणजे मी त्याचा अभ्यास करून आत्मज्ञ होईन. श्रीवसिष्ठ-रामा, अध्यात्मशास्त्रांत हे महा-रामायणसंज्ञक शम सर्वोत्तम आहे. हा उत्तम इतिहास आहे. इतर सर्व इतिहासाचे यां आहे. याचे श्रवण केल्याने अक्षय जीवन्मुक्तत्व आपोआप प्राप्त हो है अति पवित्र शास्त्र आहे. स्वप्नावस्थेत असतांनाच हे स्वम