पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ बृहद्योगवासिष्ठसार. चकीत पदार्थ रुपे नव्हे, असें अगोदर निश्चयाने जाणल्यावाचून ती शिंप आहे, असे कळत नाही. नंतर हे जग भापणास जसे दिसत आहे तसे मुळीच नाही, असे जाणून त्याचा परिहार केल्यावर जे काही तत्त्व रहातें तोच त्या ज्ञात्याचा आत्मा ठरतो. आता, बा दशरथतनया, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो. तूं जर आपले चित्त उद्विग्न न करिता काही दिवस साधुसमागम व सच्छास्त्रावलोकन करीत रहाशील तर थोड्याच अवकाशांत दृश्य सत्य आहे हा तुझा भ्रम जाईल. द्वित्वाच्या अपेक्षेने एकत्व असते. व एकत्वाच्या अपेक्षेने द्वित्व उद्भवते. पण त्यातील एक नाहीसे झाले की दोघाचीही असिद्धि होते. त्याप्रमाणे दृश्य असल्यास द्रष्टा असतो व द्रष्टा असला तर दृश्य असते. पण त्यातील कोणी एक नाहीसे झाले की, ती दोन्ही नाहीशी होतात आणि शेवटी सत् रहाते. अहता इत्यादि सर्व दृश्य हाच तुझ्या चित्तदर्पणावर मळ बसला आहे. त्याला मी आता घालवितो मुळीच असत् असलेल्या वस्तूचे निरसन करण्यात काही क्लेश नाहीत कारण असत्-वस्तूची सत्ता हा तिचा विकार आहे किंवा विवर्त आहे अथवा स्वरूप आहे, असें ह्मणताच येत नाही. मनुष्याचे शिंग ही असर वस्तु आहे व तिच्या ठायी या तिन्हीपैकी एकाही प्रकाराने सत्ता दाखवित येत नाही. त्याचप्रमाणे सत् वस्तु असत् होते, असें झणणेही जुळत नाही. कारण त्याच्यावर व्याघात हा दोष येतो. तशीच सद्वस्तूर्च उत्पत्ति होणेही व्यर्थ आहे. असत्ची उत्पत्ति तर अशक्यच आहे. सुव र्णाला कड्याचा आकार जरी दिला तरी हे सुवर्ण आहे, अशा दृष्टी त्याच्याकडे पाहू लागले की, तो आकार बाधित होतो. यास्तव जग उत्पन झाले नाही. हे जे काही दिसत आहे तो शुद्ध ब्रह्माच्या आधारा भासणारा जगदाभास आहे, असे समजले पाहिजे. पण मी काय ह्मणतों तुला चागले समजावे, ह्मणून मी अनेक उत्तम उत्तम युक्ति योजन विस्तार पूर्वक सागणार आहे. त्याच्या योगाने ते अबाधित तत्त्व स्वतः तुझ्य अनुभवास येईल. अरे खळ्या, हे जर मुळी उत्पन्नच झालेले नाहीत गचे " हे आहे" असे ग्रहण तरी कसे होणार ? कोरड्या ठणठणी वर जलप्रवाह कोठून असणार? वाझेचा पुत्र जसा नाही, माळ- जल जसे नाही, व आकाशांत झाड जसें नाहीं तसा हा जगभ्र