पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पचिप्रकरणं-सर्ग ७. १२७ दिसत नाही. ह्मणून ज्याला ती प्रथम दिसली असेल तो इतरांस ' या झाडाच्या शाखेवर पहा, ह्मणजे ती दिसेल " असे सांगतोः व त्याप्रमाणे पाहिल्यास ती इतरासही दिसते. पण त्यावेळी अतःकरणांत अभिव्यक्त झालेलें अपरोक्ष चैतन्य नेत्राच्या द्वारा प्रथम वृक्षशाखेकडे व नतर त्या शाखाग्रापासून हजारो कोस दूर असलेल्या चद्राच्या कोरीकडे एका निमि- षांत जाते. पाहणारास चंद्र व शाखाग्र ही दोन्ही दिसत असतात. यास्तव शाखामापासून दूरवर असलेल्या चंद्रापर्यंत मध्येही चैतन्याची धारा असली पाहिजे, यात काही संशय नाहीं; कारण मध्ये जर ज्ञान(सवित)- धारा नसती तर शाखाग्र व चद्र ही दोन्ही एकाच काली दिसली नसती. आतां शाखाग्र व चंद्र याचे जे ज्ञान आहे त्याचे शाखाग्र व चद्र हे विषय आहेत. यास्तव ते सविषय आहे. पण त्या दोघांच्यामध्ये जी ज्ञान-धारा आहे तिचा विषय काय आहे ? काही नाही. यास्तव तेंच परमात्म्याचे निर्विषय व अपरोक्ष चिद्रूप आहे, असे जाणावे. द्रष्टा, दृश्य इत्यादिकाची स्थिति ज्याच्यामध्ये होते व त्याचा लयही ज्यांत होतो ते, आणि जे आकाशाहूनही सूक्ष्म व आकाशासही व्यापून रहात तें परमात्मरूप होय. जग स्वभावतःच शून्य आहे; पण तेही ज्याच्या योगाने अशून्य झणजे सत् झाले आहे, व त्यातील अणुरेणूही ज्याच्या- वाचून नाही ते परमात्म तत्त्व होय. जे महाचिन्मय असूनही अज्ञास स्थूल, जड इत्यादि रूपाने दिसते; ज्याने सर्व वस्तूस अतर्बाह्य व्यापून सोडिले आहे; व त्यामुळेच हे सर्व " आहे, आहे " असे भासत आहे तें ब्रह्म होय. साराश, तें महा तत्त्वच या सर्व भ्रमाचे मूळ आहे. श्रीराम-प्रभो, ब्रह्म सत् आहे, असे कोणत्या प्रमाणाने समजते; व या एवढ्या मोठ्या प्रत्यक्षादि-प्रमाणसिद्ध व अगदी व्यवस्थित जगरूपी दृश्याचा असंभव आपण कसा ह्मणता ? श्रीवसिष्ठ-राघवा, शब्दसंज्ञक तिसऱ्या प्रमाणावरून ब्रह्म सह आहे, असे समजते. ज्ञानप्रतिबंधक दोषांचा क्षय झाला असता वेदां महावाक्याच्या योगाने त्याचे साक्षात् ज्ञान होते; पण त्यास) करणारे दोष द्वैत मिथ्या आहे, असे समजल्यावाचून जाई यास्तव आकाशाच्या नीलवर्णाप्रमाणे भासणारे हे जग अत्यंत अशी भावना अगोदर दृढ केली पाहिजे. कारण अग्रभागी दिस