पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ बृहद्योगवासिष्ठसार. पला आत्मा समजते व अशा रीतीने अंतःकरणाशी तादात्म्य पावून ते जीव होते. पण हा चेतन जीव बहिर्मुख असतो. तो विषयच या जगातील सार आहे, असें जाणतो. यास्तव तो पशु होय. याच्यापा- सूनच देह, इंद्रियें, वासना इत्यादिकांच्या अनुरोधाने जरा, मरण इत्या- दिकांविषयींच्या भीत्या उद्भवतात. मी स्थूल शरीराइन भिन्न आहे, एवढे ज्ञान त्यास जरी झाले तरी तो कृतार्थ होत नाही. मरणोत्तर काही काल त्याला स्थूल शरीर नसते. तरी पण त्यामुळे त्याचा दुःखभोग संपत नाही. कारण साक्षीचैतन्याचा विषय होणारे जे जड मन तद्रूप तो आपणास समजत असतो; आणि त्यामुळे तो दुःखाचेच भाजन होऊन रहातो. स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन शरीराचा जेव्हा क्षय होतो तेव्हा चैत- न्यास प्रिय व अप्रिय यांचा स्पर्श होत नाही. पण त्या तिन्ही शरीराचा क्षय वासनाक्षय, मनोनाश व तत्त्वज्ञान यांच्या दृढ़तेवाचून होत नाही. या तीन उपायाच्या योगाने चैतन्य विषयरहित होते. तीच त्याची मुक्त- स्थिति होय. ती अवस्था ज्या धन्य पुरुषास अनेक जन्मातील पुण्यपुज- परिपाकामुळे प्राप्त होते त्याची हृदयग्रंथी तुटते, सर्व सशय नाहीसे होतात व सर्व कर्मे क्षीण होतात. पण हृदयकमलस्थ चैतन्याला योगाभ्यासाने केवल मनोनिग्रह केला असता विषयशून्य करिता येते, ह्मणून ह्मणशील तर ती आशा व्यर्थ आहे. कारण दृश्य मिथ्या आहे, ते उत्पन्न होणेंच शक्य नाही, असे निश्चयाने समजल्यावाचून त्याचा निरोध कसा होणार? त्याचप्रमाणे नित्य चैतन्य चैतन्याचा विषय नाही, तर तें स्वयंप्रकाश आहे, असे ज्ञान, पूर्वोक्त दृश्य मिथ्या आहे, असे कळल्यावाचून कसे होणार ? साराश, राघवा, जन्ममरण-परपरेत पडलेल्या या चेतन जीवास जे आत्मा समजतात ते केवढेही जरी शास्त्रज्ञ पडित. असले तरी वस्तुतः अज्ञ आहेत. कारण जीव हाच ससार, चेतना व दुःखपरपरा आहे. तेव्हा त्याला जाणल्याने काय होणार ? परमात्म्यास जाणल्याने मात्र दुःखपरंपरा क्षीण होते. दाशरथे, मी आता तुला त्या परमात्म्याचे स्वरूप सांगतो. निर्विषय, अखंड व अपरोक्षचैतन्य हे त्याचे स्वरूप आहे. पण व्याव- हारिक जनांस त्याचा अनुभव येत नाही. ह्मणून तेच स्वरूप सर्वास समजेल अशा शब्दांनी सांगतो. शुद्वितीयेच्या चंद्राची कोर एकाएकी