पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७. १२५ श्रीराम-महाराज, आपण जो हा देव सांगितलात व ज्याचे ज्ञान झाले असतां प्राणी मुक्त होतो, तो रहातो कोठे ? व मला त्याचा लाभ कसा होईल ? श्रीवसिष्ठ-रामा, ब्रह्मदेवादिकांचे कारण व प्रत्यगात्मभूत असा हा देव काही कोठे दूर नाही. तर तो चैतन्यात्मा प्रत्येक प्राण्याच्या हृदयकमलांत व्यक्त होऊन राहिलेला आहे. पण तो केवल या शरीरांतच आहे, असे नाही. तर तो या सर्व दृश्य विश्वाकार आहे. पण तो या दृश्य विश्वा-एव- ढाच आहे, असे समजू नकोस. तर तो या विश्वाच्याही पलीकडे एका अखड रूपाने पसरला आहे. त्यास मर्यादा नाही. तो सर्व सष्ट वस्तूचे अधिष्ठान असल्यामुळे सर्वगत आहे, असें सागतां यावे म्हणून त्यास विश्वा- कार म्हणतात. पण खरोखर पहाता तोच एक असतो. त्याच्याहून विश्व म्हणून निराळे तत्त्व नाही. रामा, हे कार्यरूप विश्वच कायते त्या ब्रह्माहून भिन्न नाही, असे समजू नको. तर त्या(विश्वा)चे कारण माया व सर्व देवही तद्रूप आहेत. कारण ब्रह्मा, विष्णु, महेश, सूर्य, इद्र इत्यादि सर्व चिन्मात्र आहेत, असे समज. श्रीराम-पण, गुरुराज, हे तत्त्व आबाल-गोपालास ठाऊक असते. आबालवृद्ध हे विश्व चिन्मात्र आहे, चेतन जीवावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे, असें जाणतात. तेव्हा त्या प्रसिद्ध गोष्ठीचा उपदेश करण्यांत काय अर्थ आहे ? श्रीवसिष्ठ-सुज्ञ राजपुत्रा, हे विश्व चेतनमय जीवानी भरलेले आहे; त्याच्यावाचून यात दुसरे काही नाही व जे पदार्थ जड आहेतसे वाटतात तेही याच्यामुळेच व यासच वाटतात. यास्तव विश्वाचे प्राधान्य याच्याकडेच आहे, एवढे ज्ञान प्रायः सर्वाना असते, हे खरे; पण त्या ज्ञानाचा काही उपयोग नसतो. त्याच्या योगानें, संसा- राचा क्षय होणार नाही. कारण ते खरे ज्ञानच नव्हे. तें कां ? ह्मणून म्हणशील तर सागतो. चेतन झणजे चित्कर्ता. पण नित्य चैतन्याचा कर्ता सभवत नाही. यास्तव अनित्य चित्-ला करणारा, असाच त्याचा अर्थ होणार. चित्तवृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या चैतन्यास अनित्य म्हण- तात.. कारण तें वृत्तीबरोबर उत्पन्न होणारे व वृत्तीबरोबर नाश पावणारे असते. तें अनित्य चैतन्य आपल्या आश्रयास झणजे अंत:करणास आ