पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ बृहद्योगवासिष्ठसार. असो; याप्रमाणे मुख्य वस्तुच्या ( अन्नाच्या ) प्राप्तीचा उपाय शोधून नतर लागलेच सच्छास्त्राचें अध्ययन सुरूं करावें; व साधूची संगति धरावी. या दोन उत्तमोत्तम साधनांचा जो आश्रय करितो तो शीघ्र मुक्त होतो. जी बरी-वाईट स्थिति प्राप्त होईल तीत सतुष्ट रहावे. निंद्य कर्माची उपेक्षा करावी. ज्यास आत्मतत्त्वाचा साक्षा- त्कार झालेला असतो त्या पुरुषश्रेष्ठाला ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, इंद्र इत्यादि ईश्वराचीही करुणा येते. कारण आत्मज्ञानाच्या अभावी ते मोठ्या अवस्थेत असूनही ईर्षा, द्वेष, क्रोध इत्यादि दोषांमुळे क्लेश भोगीत असतात, असे पाहून या कृतार्थ पुरुषाचे चित्त द्रवणे साहजिक आहे. आता साधु पुरुषास कसे ओळखावे, ह्मणून ह्मणशील तर सांगतो. कोण- त्याही देशातील, प्रातातील, अथवा ग्रामातील शिष्ट (ह्मणजे श्रौत-स्माते- आचारसंपन्न लोक) ज्यास साधु ह्मणत असतील तो जर विशिष्ट ज्ञान, वैराग्य इत्यादि श्रेष्ठ गुणानी युक्त असेल तर तो खरा साधु आहे, असे ओळखावें, व त्याचा समागम करावा. सर्व विद्यांमध्ये अध्यात्म- विद्या श्रेष्ठ आहे. यास्तव त्या विद्येचे ज्या शास्त्रात प्रतिपादन केलेलें असतें तें सच्छास्त्र, असे समजावे. आत्म्यास उद्देशून प्रवृत्त झालेली जी विद्या (म्हणजे ज्ञान ) ती अध्यात्मविद्या होय. उपनिषदें, शारीरक मीमासा इत्यादि शास्त्रात तिचाच विचार केलेला आहे. यास्तव त्यास सच्छास्त्र म्हणावे. पावसाळ्यात नद्याचे पाणी प्रायः गढुळ असते. ते तसेंच प्याल्यास पोटात माती जाते व त्यामुळे विकार होतो. यास्तव लोक त्या पाण्यास निवळीची बी उगाळून लावितात. किवा त्यातून तुरटीचा खडा तीन चार वेळ फिरवितात. म्हणजे त्याच्या योगाने पाण्यातील माती तळी बसून भाड्या तील पाणी निर्मल होतें. अथवा योगाभ्यासाने चित्तवृत्ति शुद्ध होते. त्याप्र माणे वरील दोन उपयांचा आश्रय करून सतत विवेक केला असता अविद्या नाहीशी होते. तिचा क्षय होताच मोह, राग, लोभ, कोः इत्यादि तिच्या दुष्ट सततीचाही आपोआप क्षय होतो. पण या सर्वांच्य मुळाशी मुमुक्षूचा प्रयत्न आहे. त्यावाचून काही होणे शक्य नाही ६. "सर्ग ७- सर्व प्रपंचाचें मूळ व सर्व उपाधिरहित परमात्म्याचे तत्त्व था सगाई इठ बांगतात.