पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० बृहद्योगवासिष्ठसार. आहेत: स्वाभाविक नव्हेत. सांख्य शास्त्रात ज्यास पुरुष ह्मणतात; वेदान्ती ज्याला ब्रह्म समजतात; विज्ञान-वादी बौद्ध ज्यास केवल क्षणिक विज्ञान ह्मणतात, शून्यवादी बौद्ध ज्यास शून्य ह्मणतात; सूर्य, चंद्र इत्यादि तेजा- चाही जो प्रकाशक, जो बोलणारा, मनन करणारा, कर्मफल भोगणारा, अनुभव घेणारा व कर्ता आहे; जो सद्रूप असतानाही अज्ञांस या जगांत असत् असल्यासारिखा भासतो, जो शरीरात साक्षि-रूपाने असतांनाही मूढांस कोठे तरी लाब आहे, असे वाटते; सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे ज्याचा चैतन्यप्रकाश सर्वत्र पसरला आहे; सूर्यापासून जसे किरण त्याप्रमाणे ज्या- च्यापासून विष्णु, इद्र इत्यादि देवता उप्तन्न होतात; सागरात जसे बुडबुडे त्याप्रमाणे ज्याच्यापासून अनत जगे निर्माण होतात, भूमीवरील सर्व जल जसें समुद्राकडे जाते त्याप्रमाणे हा सर्व दृश्यसमूह ज्यास जाऊन मिळतो, जो दिव्याप्रमाणे आपल्या स्वरूपास व इतर अनात्म-पदार्थासही प्रकाशित करितो, जो आकाशात, शरीरामध्ये, पाषाणात, जलात,मातीच्या सूक्ष्म कणात, पर्वतामध्ये, वायूचे ठायी व पातालांतही स्थित आहे; जो आ- पल्या चैतन्याने आपापला व्यापार करण्यास उद्युक्त असलेल्या पुर्यष्टकास अतर्बहिः व्यापून सोडतो, अर्थात देहादिकामध्ये आढळणारी चेतनता ज्याच्यामुळे असते; ज्याने मोठमोठ्या शिळांस मुक केले आहे; व त्यामुळे त्या ध्यानस्थ असल्यासारिख्या दिसतात; आकाशास ज्याने शून्य केले; पर्वतास ज्याने घन केले. जलास ज्याने द्रवयुक्त निर्मिलें; व सूर्यास ज्याने आपल्या स्वाधीन असलेला दीप केलें आहे, ज्याच्यापा- सून विचित्र सृष्टि उद्भवतात; कोरड्या ठणठणीत माळ भूमीवरील जल प्रवाहा(मृगजळा)प्रमाणे ज्याच्यापासून उत्पत्ति-विनाशयुक्त त्रिभुवन- लहरी उठत आहेत; जो प्रपंचरूपाने नाशरूप, स्वरूपतः अविनाशी, अतिसूक्ष्म असल्यामुळे सर्वामध्ये गुप्त असणारा आणि अति महान् असल्यामुळे सवोहून निराळा ( प्रपचशून्य ) आहे; तोच या असत् मनाचे मूळ आहे. शुद्ध चैतन्यामध्ये उत्पन्न झालेलीः ब्रह्माड हेच जिचे उत्तम फल आहे; चित्त हे जिचे मूळ आहे व इंद्रिये हीच जिची पाने आहेत अशी प्रकृतिरूपी १ कर्मेंद्रियपंचक, ज्ञानेंद्रियपंचक, प्राणपंचक, सूक्ष्म भूतपंचक, अंतःकरणचतु- ध्य, अविद्या, काम व कर्म या भाठांस पुर्यटक (मा परे) अणतात.