पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ५. ११९ 'आहे' असे प्रत्यक्ष भासणारे हे जग उत्पन्नच झाले नाही व ते नाही' हे मला निश्चयपूर्वक कळले पाहिजे. त्याशिवाय मी " होय " म्हण. णार नाही. __ श्रीवसिष्ठ-राघवा, तुझे द्वैतसस्कार दृढ झालेले आहेत. यास्तव एकाएकी तुझे किंवा दुसऱ्या कोणाचंही समाधान होणार नाही, हे मला ठाऊक आहे. दृश्य सत्य आहे, असा आग्रह धरून भाडणाऱ्या अज्ञावर आम्ही कधी रागावत नाही. तर उलट त्याची किंव करून त्यास वारंवार तत्त्वोपदेश करित असतो. असो, मी जे वर सांगितले आहे ते अगदी सत्य आहे. बाबारे, दृश्य मिथ्या आहे, हे आमचे मणणे त्रिकाल-सत्य आहे. तर मग ते सत्य असल्यासारिखे कसे भासते, ह्मणून म्हणशील तर-स्वप्नांतील विषय स्वप्नकाली जसे सत्य भासतात त्याप्रमाणे हे जाग्रतीं- तील दृश्य जामत्कालीं सत्य भासतें-असे वर सागितलेंच आहे. साराश हा सर्व मनाचा खेळ आहे. या भ्रमाचे कारण मन आहे, व तेच या ससारवृक्षाचे मूळ आहे. चांचल्य ही त्याची स्वाभाविक शक्ति असल्या- मुळे ते हे सर्व गारुड रचण्यास समर्थ होते ४. सर्ग ५-विश्वाचे मूळ मन आहे. मनाचे मूळ आत्मतत्त्व आहे, इत्यादि तत्त्व- ज्ञान येथे सांगतात श्रीराम-भगवन्, या मनोभ्रमाचे परमार्थभूत मूळ काय आहे. झणजे मन या भ्रमाचे सत्य ( अबाधित) अधिष्ठान काय आहे ? ते कसें उत्पन्न झाले. हणजे त्याच्या आरोपाचा प्रकार कसा आहे ? व ते मायामय (मिथ्या) असण्याचे काय कारण ? मन हे सृष्टीतील पहिले कार्य आहे. यास्तव अगोदर सक्षेपतः त्याच्या मूळाचे ज्ञान झाले ह्मणजे मग सर्व जगाचे मूळ काय आहे, ते सहज समजेल, असे मनात आणून मी हे तीन प्रश्न करीत आहे. श्रीवसिष्ठ-राघवा, तुझ्या या प्रश्नांतील पहिल्या प्रश्नाचे उत्तर मी अगोदर देतो, ते ऐक. महाप्रलयसमयीं सर्व दृश्य प्रपच नाहीसा होऊन तो बीजरूप होऊन राहिला असतां केवल शांत तत्त्व राहते. तोच परमात्मा होय. तो सर्वशक्तिमान् परमात्मा केव्हाही नाहीसा होत नाही. त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य वाणीमध्ये नाही. पण जीवन्मुक्त त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आत्मा, ब्रह्म, पुरुष इत्यादि त्याची नांवें कल्पित