पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ बृहद्योगवासिष्ठसार. राहील; व त्या बीजापासून पुनः त्याचा उद्भव होईल; आणि येणेप्रमाणे मोक्ष कधीही होणार नाही. यावर कोणी ह्मणतील की, परिणाम-वादी साख्य शास्त्राची परि- भाषा अशी आहे. हा चिदात्मा, आपल्या बाह्य ( विलक्षण) अस- लेल्या प्रधानांतच असलेले हे दृश्य, बुद्धीहून मी भिन्न आहे, असा विवेक न झाल्यामुळे, आपल्या ठायींच आहे, असे पाहतो ( समजतो). हाच ससार होय, पण विवेक-ज्ञानाचा उदय झाल्यामुळे अविवेकजन्य आभि- मान निवृत्त होतो व त्यामुळे बाह्य दृश्य जसेच्या तसेच असतानाही तो मुक्त होतो. यास्तव तुझी ह्मणता त्याहून परिणाम-वाद्याची मोक्षाची कल्पना भिन्न आहे. अर्थात् वर सागितलेली अडचण येत नाही. पण ते बरोबर नाही. कारण जीवन्मुक्त देव, ऋषि व मुनि-" जर हे जग खरोखर असते तर मोक्ष कोणालाही मिळाला नसता, पण आम्ही मुक्ता- वस्थेचा अनुभव घेत आहो, व त्यावरून आमचा असा निश्चय झाला आहे की, हे दृश्य, मग ते बाह्य असो की आतर असो, केवल क्षणभंगुर ( मिथ्या ) आहे," असे झणतात; झणजे हा त्या अनुभवी लोकाचा सिद्धांत आहे यास्तव राघवा, विषयी व केवळ तार्किक यांस भयप्रद वाटणारी ही माझी प्रतिज्ञा तू ऐक. "सर्व दृश्य नाममात्र आहे. तें प्रत्यक्ष दिसत असले तरी अक्षर- ब्रह्मरूप आहे घटाकाश जसें महाका- शात असते व त्यास सोडून त्याला जाता येत नाही त्याप्रमाणे प्रत्यक्- आत्मा पूर्ण ब्रह्मामध्ये असतो. त्याचा वियोग कधीही होत नाही. खरोखर पहातां दृश्य, द्रष्टा, दर्शन, शून्य व जड, इत्यादि त्याच्यामध्ये काही नाही. तर ते अति शात तत्त्वच सर्वत्र पसरले आहे." श्रीराम-गुरुराज, आपण मजवर रागावाल हे मला ठाऊक आहे. पण मनात आले आहे ते मी स्पष्ट सागतो. आपले हे भाषण, वाझेच्या मुलाने पर्वताचे चूर्ण केलें; सशाचे शिंग गात आहे, शिला भुजा पसरून व हावभाव करून तांडवनृत्य करीत आहे; वाळूतून तेल गळत आहे; दगडी बाहुल्या वेदपठण करीत आहेत; चित्रातील मेघ गर्जना करीत आहेत, इत्यादि वाक्यांप्रमाणे चमत्कारिक वाटते. जरा, मरण, दुःख, पर्वत, वृक्ष, आकाश, चतुर्विध प्राणी इत्यादिकांनी युक्त असलेले हे जग नाही, असें में भापण मला सांगत आहां त्याचा अर्थ काय ? महाराज,