पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ बृहद्योगवासिष्ठसार. ही वृक्षांची समष्टि आहे. ब्रह्मा जर सर्व समष्टिरूप आहे तर त्याला दूसरे आणखी काय उत्पन्न करावयाचे असते? ह्मणून विचारशील तर सांगतो. दीर्घकाल सूक्ष्म अवस्थेत असलेल्या मनांतील विशेष तत्त्वाचे मिश्रण करावे झणजे पचीकरणाने त्यांस स्थूल करावे, असे त्याच्या मनांत येते. या इच्छेमुळेच तो स्रष्टा होतो, व पृथिवी, आप इत्यादि स्थूल भूते उत्पन्न करावयाचे (स्रष्टव्य ) पदार्थ होतात. पण मन, अहकार इत्यादि हा सर्व दृश्य प्रपच अविद्येचा विलास असल्यामुळे अविद्यामय आहे व ससृति, चित्त, मन, बध, मल, तम इत्यादि ही सर्व तिचीच नावें आहेत दृश्य मनोमय असते व ते उत्पन्नच झाले नाही, असे मी पुनः एकदा सागून ठेवितों. तात्पर्य चैतन्याचे ठायी अविद्येची स्थिति होणे, हीच जगाची स्थिति होय. वायूच्या चाचल्याप्रमाणे किंवा जलाच्या द्रवत्वा- प्रमाणे दृश्य हा अविद्यायुक्त चैतन्याचा स्वभावच आहे. त्यामुळे सोन्याचे कडे जसे सोन्यास सोडून कधीही राहू शकत नाही त्याप्रमाणे दृश्य द्रष्टयास सोडून रहात नाही. तर द्रष्टयाच्या सत्तेनेच ते सत्तावान् होते. पण याप्रमाणे द्रष्टयाच्या ठायी भनन्य-(अपृथक्, ऐक्य )रूपाने राहिलेलें जे हे दृश्य त्याचेही मी आता पुढे आरशावरील मळाप्रमाणे मार्जन करणार आहे. ते नाहीसे झाले की चैतन्याचे द्रष्टुत्वही आपोआप क्षीण होईल. कारण दृश्यामुळेच ते द्रष्ट्र होत असते. पण याप्रमाणे असत-दृश्याचा बाध झाल्यावर केवळ सच्चित्-रूपाने रहाणारा आत्मा केवळ अवस्थेत रहातो. वायु शात झाला असता जलाशयांतील क्षुब्धता जशी शात होते त्याप्रमाणेच चित्तात अशा प्रकारचे हे कैवल्य प्रादर्भूत झाले असता राग-द्वेषादिवासना शात होतात. पण विषयावाचून ज्ञान राहील कसे ? म्हणून म्हणशील तर त्यात फारसा अर्थ नाही. कारण दिशा, भूमि, वृक्ष इत्यादि सर्व प्रकाश्य वस्तु नसल्या तरी सूर्याचा प्रकाश जसा त्या नाहीत, असे दाखवीत रहातो; त्याप्रमाणे दृश्य नसले तरी ज्ञान राई शकते. एकाद्या नाटक शाळेत लाविलेला दीप तेथे नटादि असल्यास त्यास प्रकाशित करतो व कोणी नसले तरी स्वतः तेवत रहातो. मोठ्या रस्त्यावर टागलेला मोठा आरसा रस्त्यातून गाडी, घोडा, मनुष्य, गाय इत्यादि जे जे काहीं जाईल त्यास आपणामध्ये व्यक्त करितो व मार्गात काही नसले तरी तो स्वरूपाने असतो. त्याप्रमाणे ज्ञानही मी, तू, हे जग,