पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४. ११५ रमणीय मडलांच्या द्वारा “ बाबानों, जरी आपत्ति आली तरी धीर सोई मका. ती जशी आली आहे तशीच मुकाव्याने जाईल" असें प्रत्येक कर्मवश असलेल्या प्राण्यास सागत होता. असो; महात्म्यांच्या चित्तांत विवेकवृत्ति जशी उद्भवते त्याप्रमाणे या ब्रह्मांडोदरांत उदय पावलेल्या त्या भगवानास नमस्कार करून सर्व जन आपापल्या नित्य व्यवहारास लागले. राजाच्या सभेतील सभासद सभास्थानाकडे त्वरेने येऊ लागले. थोड्याशाच अवकाशात सभास्थान भरून गेले. राजा दशरथ, त्याचे पुत्र, त्याच्या स्त्रिया, ऋषिवर्ग, मत्रीसमूह इत्यादि सर्व स्व-स्वस्थानी विराज- मान झाले असता व सर्व लोक स्वस्थ बसले असता राघव मधुर वाणीनें आपल्या कुलगुरूंस ह्मणाला-भगवन्, मन सकल्पाने हे सर्व निर्माण करिते, असें तुझी मला काल सागितलेत. पण त्या मनाचे स्वरूप कसे काय आहे, ते मला आता अगोदर सागा. श्रीवसिष्ठ-रामा, शून्य व जड अशा या आकाशाप्रमाणेच म- नालाही रूप मुळीच नसते. ते केवल शब्दमात्र आहे. मन या शब्दापलीकडे त्याचे स्वरूप काही नाही. देहाच्या बाहेर किंवा हृदयांत त्याचे सद्रूप आढळत नाही. तरिपण हे रामा, तें आका- शाप्रमाणे सर्वत्र आहे, असे समज. असल्या या स्वरूपशून्य मनापा- सून मृगजळाप्रमाणे हे जग निर्माण झाले आहे. पुढे प्रत्यक्ष असलेल्या अथवा पुढे नसलेल्या (परोक्ष) पदार्थाचे जे हे तदाकार भान होते तेंच मन होय. ह्मणजे निराकार चैतन्याचे ठायी होणारा जो हा विषयांचा अध्यास त्यासच मन ह्मणतात. संकल्प हेच मन आहे. जेथें द्रवत्व तेथें जल व जेथे स्पदन तेथे वायु त्याप्रमाणेच जेथे संकल्प तेथें मन. अर्थात् मन व संकल्पही एकच होत. आता तू कदाचित् ह्मणशील की, चैतन्ययुक्त वृत्तिच पदार्थास प्रकाशित करिते व चैतन्य तर सत्य आहे. तेव्हां चैतन्याचेच बनलेले मन मिथ्या कसे होईल ? तर याचे उत्तर असे. विषय मिथ्या असल्यामुळे तदाकार झालेले मन मिथ्या असो की, ते सत्य चैतन्याचेंच बनलेले असल्यामुळे सत्य असो; त्याविषयी आमचे काही झणणें नाहीं; ज्याने त्याने आपापल्या समजुतीप्रमाणे त्यास जाणावे. आमचे तूर्त एवढेच ह्मणणे आहे की, मन जसे असेल तशीच त्याची समष्टि असणार व ती समष्टिच ब्रह्मदेव आहे. समष्टि मणजे समूह. वन