पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ बृहद्योगवासिष्ठसार. जी अवस्था झाली होती तीच त्या बिचान्यो( अंधकारांची झाली. उपहारादि केल्यावर ऋषि, राजे व इतर जन दिवसां ऐकलेल्या अपूर्व वाणीचा विचार करीत निजले; व त्यांनी स्वप्नांतही दिवसां घडलेला प्रकारच पाहिला. पुढे त्याचे चित्त सद्रूप परमात्म्याशी मिळून गेल्यामुळे त्यांस जगाचे भान राहिले नाही. ते सर्व आनंदसागरांत व एकमेवाद्वितीय- स्थितींत निमग्न झाले होते. त्याची तीच स्थिति जर त्रिकाली तशीच रहाती तर श्रीवसिष्ठाना अधिक उपदेश करण्याचा प्रसंग आला नसता. पण त्यांची दुष्ट कर्मे त्यांस कोठलीं सोडणार ? ती पुनः फलोन्मुख झाली. त्याबरोबर सर्व हळु हळु जागे झाले. तो पहाट झाली होती. चद्रमा पश्चिमार्धात चमकत होता. पूर्वदिशेत अरुणाचे तेज पसरूं लागले होते. कोबड्यांनी ओरडून एकच गोगाट करून सोडिला होता. राजाचे स्तुति- पाठक आपल्या स्वामीची स्तुति करीत होते. धार्मिक भगवद्भक्त भगवानाचे गुणानुवाद गात होते इतक्यांत हळु हळु रात्रीची शोभा कमी होऊन नक्षत्रे मावळू लागली. वस्तु सर्वदा सारख्याच अवस्थेत रहात नाही, असे चंद्रमा आपल्या निस्तेज मंडलाने लोकांस सुचवू लागला. सच्छील ब्राह्म- णादि, शौचादी आटोपून, संध्येचा मुख्य काल जाऊं नये ह्मणून स्नान करण्याच्या गडबडीत लागले. प्रहर रात्र असतानाच उठून, आपल्या शिष्यांस पाठ सांगू लागलेले श्रोत्रिय, सध्याकाली अध्ययनाचा निषेध असल्यामुळे, ते सपवून इतर नित्य कर्मीच्या अनुष्ठानास प्रवृत्त झाले. शिष्यवर्ग गुरूच्या कचाव्यातून सुटल्यामुळे थोडासा आनदित होऊन इतस्ततः स्वैर हिंडूं लागला. शुश्रूषु आपल्या विद्यागुरूंच्या सेवेत तत्पर रहाण्याकरिता गुरूच्या पूर्वी स्नानादि करून होमशाळेत अनुष्ठानाचे साहित्य जमवू लागले. इतक्यात चागले उजाडले. एकही नक्षत्र दिसेनासे झाले. चद्राचा प्रभाव ज्याच्यापुढे मुळीच पडला नाही, असा अतर्गृहातील अंधकारही चार प्रहर तेथें सुखाने राहून, आता मात्र आपला येथे निभाव लागत नाही, असे पाहून, एकाद्या म्याड क्षत्रियाप्रमाणे पळून जाण्याच्या तयारीस लागला. राजाच्या प्रतिबंधातून सुटलेल्या राजकीय कैद्यांप्रमाणे पक्षी पुनरपि पूर्वीप्रमाणेच लोकांस प्रिय वाटतील, असे मंजुळ ध्वनि करू लागले. सारांश कालाच्या नियमाप्रमाणे, जाण्याकरितांच मालेली रात्र सपली व भास्कराचा पुनः उदय झाला. तो नारायण आपल्या