पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११३ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४. लोकाची मोठी गर्दी झाली. एकमेकांचे अंग एकमेकांस लागले. राज- गृहाच्या बाहेर पडेपर्यंत सर्वांनाच मोठी अडचण झाली. पण बाहेर पडल्यावर लोक इतस्ततः आपापल्या स्थानाकडे जावयास निघाले. त्यामुळे त्या राजगृहाच्या चारी बाजूचे मार्ग त्या श्रोत्यांनी भरून गेले. मार्गाने जात असतानाही, त्याच्या मनात मुनींनी सागितलेला उपदेश बोळत असल्यामुळे त्यांच्या इंद्रियवृत्ति शात होत्या. त्यातील जे नभश्चर होते ते विमानात बसून अतरिक्षात गेले व जे एचर होते ते भूलोकी राहिले. त्या सर्वांनी आपापल्या स्थानी जाऊन संध्यावदनादि क्रिया आरभिल्या. इतक्यात कृष्णवर्ण रात्र दिसू कागली. दिनमणी ( सूर्य ) दुसऱ्या लोकास प्रकाशित करण्याकरिता ला होता. कारण सर्वास प्रकाश देणे, हेच सत्पुरुषाचे मुख्य कर्तव्य अ- सते. पण तो तेजोनिधि गेल्यामुळे रात्रीस वृद्धि पावण्यास व क्षुद्र नक्षत्रास धमकण्यास अवकाश मिळाला. अंतरिक्ष एकाद्या प्रफुल्लित वृक्षाप्रमाणे दिसू लागले. लहान मोठ्या नक्षत्राकडे पाहून विचारी लोकाच्या चित्तात अनेक सात्त्विक तरग उठू लागले. निर्मळ चित्तवृत्ति जशा गाढ निद्रास- प्रयीं चित्तात लीन होतात त्याप्रमाणे, दिवाभीतास सोडून, इतर सर्व पक्षी आपापल्या घरात जाऊन पूर्वीच बसले होते, पश्चिम दिशा आरक्तवर्ण दसत होती, ती हळु हळु कृष्णवर्ण झाली. त्रैवर्णिक सध्यावंदनात निमग्न साले होते. पण त्याच्या पूजेचा स्वीकार करून सध्या गेली असता चारी दिशात गाढ अंधकार पसरला. विधवा स्त्रियाप्रमाणे पूर्वादि दिशाची मुखें काळी ठिक्कर पडली. पण अशा अवस्थेत काही काल जात आहे तोच नेशापति (चद्र) आपल्या दुःखी स्त्रीचे जणु काय सात्वन करण्याकरिताच पूर्व दिशेत क्षितिजावर चमकू लागला. त्यामुळे पूर्व दिशेच्या सुखास तर पारच राहिला नाही, पण तिच्या प्रफुल्लित मुखाकडे पाहून दक्षिण, पश्चिम इत्यादि दिशा मनात अति मत्सर करू लागल्या. पण तो भगवान् ओषधिपति पक्षपाती नव्हता. त्या सज्जनाने थोडक्याच वेळात भूलोकच्या सर्व चराचरांस आनदित केले. सज्जनाचा अभ्युदय झाला की, दुर्जनाचा नाश आपोआप होत असतो. त्याच न्यायाने चद्रोदय होतांच सर्व जगास भापल्या भयंकर आकारानी अच्छादित करणारे दुष्ट अंधकार पार नाहीसे माले. दिवसां श्रीवसिष्ठांचा उपदेश ऐकून श्रोत्याच्या चित्तांतील भज्ञतेची