पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३. रणे ह्मणतात. पण या सकल्पमात्र सृष्टीस रचताना ब्रह्मदेवास सुताराद- काप्रमाणे तासणी, करवत, हातोडा, इत्यादिकाचे सहाय ध्यावे लागत नाही. त्यामुळे कारणाहून काये भिन्नस्वरूपाचे आहे, असे येथे ह्मणता येत नाही. फार काय पण जग व ब्रह्म यामध्ये कार्य -कारणताही सिद्ध होत नाही. कारण खरोखरच जर एकादे कार्य कारणापासून उत्पन्न झाले असले तर ते, या अमक कारणाचे हे कार्य आहे, असे सागता येणार. पण सर्वच जेथे मनोमय व सकल्पजन्य कारभार आहे तेथे कार्य-कारणभाव कसा दाख- विता येणार? साराश, जसे पर ब्रह्म तसेच हे त्रिभुवन आहे. अनादि अवि- धेमळे जरी जगाचे स्वरूप अगदी विलक्षण भासत असले तरी तो भ्रमाचा खेळ आहे. दृश्य, दर्शन व द्रष्टा याचे परमार्थतः ऐक्य आहे. हे जोपर्यत मोठ्या पुण्यप्रभावामुळे समजलेले नसते तोपर्यतच हा सर्व प्रपच- बाजार भरलेला असतो. सर्व दृश्य, मनातच भासते. मनाच्या बाहेर कोठेही भासत नाही. याला स्वप्न व मनोराज्य हे दोन उत्तम दृष्टात आहेत. स्वप्ना- तील व मनोराज्यातील सर्व पदार्थ मनोमय असतात, हे प्रत्येकास स्वानु- भावावरून समजण्यासारिखे आहे. काल्पनिक पिशाच जसे लहान मुलास व्याकुल करून सोडते व प्रसगी त्याचा प्राणही घेते त्याप्रमाणे ही मयो- मय सृष्टि अगोदर द्रष्टयास आच्छादित करून सोडते व नतर बीजात गुप्त असलेला वृक्ष जसा अनुकूल अवस्था मिळताच फोफावतो ( विस्तार पा- वतो ) त्याप्रमाणे दृश्यबुद्धि विस्तार पावते. त्यामुळे जग सत्य होऊन ब- सते. पण वस्तुत: ते सत्य नाही. आह्मी मोठ्या आग्रहाने जग मिथ्या आहे, असे का सागतो ह्मणून तू ह्मणशील तर त्याचे उत्तर असे-दृश्य जग सत्य आहे, असे मटल्यास दृश्यामुळे होणारे दु ख व बध कधीही नाश पावणार नाहीत, व त्याचा नाश झाला नाही तर बोद्धा जो आत्मा त्याला केवल-अवस्था कधीही प्राप्त होणार नाही. पण दृश्य मिथ्या आहे. वस्तुतः ते असणे सभवत नाही, असे हटल्यावर बोद्धयाचे बोद्धत्व सत्य आहे, असे जरी क्षणभर मानले तरी त्याचा नाश झाल्यावाचून रहाणार नाही. मग मिथ्या सृष्टीमुळे त्याच्याकडे आलेले मिथ्या बोद्धृत्व नाश पावेल हे निराळे सागावयास नकोच, आणि मी या जगास जाणतो, असे म्हण- णारा बोद्धाच जगाच्या मिथ्यात्वामुळे नाहीसा झाला की, राहिलेले में शद । निर्विकार चैतन्य तोच मोक्ष, निर्वाण, व पर ब्रह्म होय. तात्पर्य येणे-