पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३. १०९ पूर्व कमे असले पाहिजे; त्यावाचून त्याला या पदाची प्राप्ति होणार नाही व मनोमय शरीरालाही काही आकार असला पाहिजे; त्यावाचून ते अन्न- कार्य आहे, असे म्हणता येणार नाही; म्हणून ह्मणशील तर ते खरे आहे. पण उपनिषदातील ते सर्व वर्णन अज्ञ मनुष्याची समजूत पाडण्याकरिता केलेले आहे. तत्त्वज्ञाच्या दृष्टीने त्यातील एकही गोष्ट खरी नाही. हा प्रपंच पूर्वी नव्हता, आता नाही व पुढे नसणारच-असें तो निःशकपणे जाणतो. तर मग हे सर्व जग व्यवस्थित रीतीने चालले आहे व यात पुष्कळ नियमित प्रकार होत आहेत, असा सर्व प्राण्याना जो अनुभव येतो तो का ? असे विचारशील तर सागतो. तो अनुभव ज्या अवस्थेत येतो, त्या अवस्थे पुरता, हा प्रपचही सत्य आहे. पण ती अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेत गेले की, तो मिथ्या ठरतो. स्वप्नामध्ये स्वप्नप्रपच जसा सत्य असतो, त्याप्रमाणे जाग्रतीत जाग्रत्प्रपच सत्य आहे. पण पहिला प्रप्रच दुसऱ्या अव- स्थेत जसा मिथ्या तसाच दुसऱ्या प्रकारचा प्रपच पहिल्या अवस्थेत मिथ्या ठरतो उपनिषदे अज्ञ पुरुषाना परमात्म्याचे ज्ञान करून देण्याकरिता प्रवृत्त झाली आहेत यास्तव, त्याच्या भाषेत व त्याच्याच समजुतीप्रमाणे प्रतिपादन करणे, त्यास अवश्य आहे. पण परमार्थ दृष्टया किवा ज्ञानि-दृष्टया पाहिल्यास प्रपच त्रिकाली नाही, असेच म्हणावे लागते. या परमार्थ-दृष्टीस अनुस- रूनच मी येथे ब्रह्माच्या पूर्वजन्माविषयी तुला सागत आहे. जग मिथ्या कसे, हे चागल्यारीतीने कळण्यास त्याचा फार उपयोग होईल. साराश, रामा, ब्रह्मदेवाला एक आतिवाहिक म्हणजे सूक्ष्म देहच असतो. त्या अज स्वयभूस इतर प्राण्याप्रमाणे आधिभौतिक देह नसतो. जन्म आधि- भौतिकाचाच होणे शक्य आहे. जगातील प्राण्याची उत्पत्ति म्हणजे काय ? तर आधिभौतिक देहाची उत्पत्तिच होय. कारण सर्वव्यापी व नित्य आत्म्याप्रमाणे सूक्ष्मदेहही उत्पत्तिशून्य व नाशशून्य आहे. त्याचा नाश मुक्तीच्या वेळी मात्र होतो. अथवा आतिवाहिक देहाचा नाश झणजेच मोक्ष होय. वस्तुस्थिति अशी असल्यामुळेच मृत्यु ब्रह्म- देवास मारू शकला नाही. ___ असो, राघवा यावरून एक गोष्ठ तुझ्या ध्यानात आली असेल, ती ही की, कर्म, वासना इत्यादि कारणापासून होणाऱ्या भूतास दोन देह असतात व अज स्वयभूस पूर्वोक्त कारणांच्या अभावी