पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ बृहद्योगवासिष्ठसार. आहे. अर्थात् विष्णु, शिव, व ब्रह्मा हे तीन त्याचे अवयव आहेत. यालाच कार्य-ब्रह्म ह्मणतात. सहस्रशीर्षा पुरुष व प्रथम शरीरी हाच होय. ) असे जर आहे तर निराकार, सकल्परूप ब्रह्मदेवाला पुरुषाकारता कोठून आली ! असे तुला वाटेल ह्मणून त्याचे उत्तर सागतो. राघवा, चित्रे काढणारे चितारी अगोदर मनामध्ये चित्राचा आकार कल्पितात व नतर तसेच ते बाहेर काढितात. पण त्याच्या मनातील चित्राच्या प्रतिमेला देह ह्मणता येईल का? नाही. पण ती आत देहाकार भासते. त्याच- प्रमाणे चिदाकाशाचे स्वच्छ प्रतिबिब घेणारे जे मन तेंच ब्रह्मा होय. ह्मणजे तेच प्रजापतीच्या शरीराच्या आकाराने भासते. साराश मनाचा प्रजापति-शरीराकार परिणाम वास्तविक नव्हे, तर तो भ्रम आहे. केवल, अनत व आदि-मध्यावसानशून्य चिदाकाशच मूळ अज्ञानामुळे तदाकाराने भासते असे तू समज २. । सर्ग ३-ब्रह्मा मनोमय आहे. जग त्याच्या संकल्पमय आहे. यास्तव ते मनो- राज्याप्रमाणे असत् आहे, असे येथे वर्णन करितात. श्रीराम-गुरुवर्य, ब्रह्मा मनोमय आहे, असे मानल्यास एक मोठी अडचण येते. ती कोणती झणून ह्मणाल तर सागतो. मन वासनासमूह- रूप असते, असे आपणच मला सागितले आहे. तेव्हा ब्रह्मा मनोरूप आहे, असे मटल्यावर "याचे प्राक्तन वासनाजाल मुळीच नसते" या आपल्या ह्मणण्याशी विरोध नाही का येत ? शिवाय आपले, माझे, किवा पशु, पक्षी इत्यादि कोणाही प्राण्याचे शरीर पूर्वजन्मातील अन्त्यमतीप्रमाणे जसे उद्भवते तसे त्याचेही शरीर, पूर्व शरीर सोडताना झालेल्या कर्मानुरूप स्मृतीप्रमाणे उत्पन्न होते, असे ह्मणण्यास कोणता प्रत्यवाय आहे ? व पूर्व स्मृतीप्रमाणेच ब्रह्मदेवाचा हा देह उत्पन्न झाला, असे झटल्यावर त्याचा पूर्वजन्म, कर्मे, वासना, मरण इत्यादि सर्वाची प्राप्ति नाही का होत ? वसिष्ठ-रामा, तू ह्मणतोस ते खरे, ज्याला शुभाशुभ कमासह पूर्व देह असतो त्यास पूर्वशरीर सोडताना कर्मानुरूप अत्यमति उद्भवणे व त्या अंत्य स्मृती- प्रमाणे उत्तर देह प्राप्त होणे, अगदी न्याय्य आहे. पण ब्रह्मदेवाला पूर्व देहच नव्हता. मग प्राक्तन कर्म व तदनुरूप स्मृति कोठून होणार ? "कर्म व उपासना यांच्या अनुष्ठानाने हिरण्यगर्भ-पदप्राप्ति होते, असें; व “ मन अन्नमय आहे" असें; उपनिषदात सागितले आहे. तेव्हां ब्रह्मदेवाचेह