पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २. १०७ नित्य, व निरुपाधिक आत्मरूप ब्रह्म असते, व तेच या द्विजाचे स्वाभाविक सत्य रूप आहे. सृष्टीच्या उत्पत्तीचा काल आला असता वासनारूप बीजामुळे विराट-शरीररूपी तेज त्याच्या पुढे,भासू लागते. अविद्येमुळे तो त्यासच 'मी' असे मानतो. याप्रमाणे हा ब्राह्मण सृष्टीच्या आरभी अबरोदरात चिदाकाशरूप धारण करून राहिला खरा, पण तो नाम, जाति इत्यादि विकल्पानी रहित आहे, त्याला वस्तुतः देह नाही, कम नाहीत, कर्तृत्व नाही व वासना नाहीत. हा शुद्ध चिदाकाश आहे. विज्ञानरूपानेच व्यापून राहिलेला आहे. याचे प्राक्तन वासनाजाल मुळीच नाही. सर्व बहिर्मव चित्तप्रवृत्ति शात झाली की, मग त्याचे असले रूपही अनुभवास येत नाही. तर अधिष्ठानरूप तत्त्वाचा परिचय झाला असता विपयाचा बाध होऊन त्याचे ज्ञानही जसे चिदाकाशरूप होऊन रहाते त्याप्रमाणे प्रस्तत प्रसगीही होते. साराश, चैतन्य हाच त्याचा स्वभाव आहे, असे ज्ञानही ज्यास सहन होत नाही त्याच्या ठायी पृथिवी, आप इत्यादि तत्त्वे कशी सहन होतील? यास्तव, बा मत्यो, त्याम मारण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नको. कारण आकाशास कधी तरी कोणी बाधू शकेल काय ? यमाचे हे भाषण ऐकून आश्चर्यच- कित झालेला मृत्यु आपल्या मदिरी गेला. राम-गुरुराज, तुम्ही मला सागितलेला हा आकाशज प्रपितामह ब्रह्मदेव असावा असे मला वाटते. श्रीवसिष्ठ-होय. रामा, तू अगदी बरोबर ओळखिलेस. पूर्वी मृत्यूने यमाशी या ब्रह्मदेवाकरिताच वाद केला. मन्वतराच्या शेवटी सवे-भक्षक मृत्यु इतर प्राण्याचा सहार करीत ब्रह्म- देवापर्यत जाऊन पोचला व तो व्यसनी काळ त्यासही खाण्यास तयार झाला. पण यमाने त्यास उपदेश करून त्या साहसापासून परत फिरविले ब्रह्मदेव मनोमात्र आहे. आकाशाचे ठायी आकार नसतानाही, केवल भ्रमाने, उपड्या निळ्या कढयीप्रमाणे जसा त्याचा आकार दिसतो तसाच या ब्रह्मदेवाच्या शरीराचा प्रकार आहे. खरोखर पाहता केवल परमात्म्याचे ठायी दृश्य नाही व द्रष्टाही नाही. तर केवल चैतन्य-स्वभावता आहे. पण अनादि अविद्येमुळे त्याच्याठायी हा पद्मज उत्पन्न होतो. सकल्प-मात्र मनालाच ब्रह्मा ह्मणतात. (पण हा ब्रह्मा पुराणातील विष्णु व शिव याच्या बरोबरीचा तिसरा देव नव्हे. तर त्या तिघाचाही समुदाय हिरण्यगर्भ