पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ बृहद्योगवासिष्ठसार. नाही. तुझ्या भक्ष्यस्थानी पडण्यासारखे त्याने जन्मानतरही काही कर्म केलें नाहीं साराश तो परब्रह्मस्वरूप आहे. दृश्यस्वरूपी नाही. आता प्रा- णस्पदन करणे, हे त्याचे कर्म आमच्या दृष्टीस पडते खरे, पण ते आपले कर्म आहे, असे तो मानीत नाही. तर मग त्याची देहादि-बुद्धि कशी अनुभ- वास येते, म्हणून म्हणशील, तर बाबारे, ती केवळ भावना आहे. “ मी देह आहे " ही भावना सत्य आहे, असे तो कधीही मानीत नाही. जला- मध्ये जसे द्रवत्व असते. आकाशात जसे शून्यत्व आढळते व वायूचे ठायीं जसा स्पद असतो त्याप्रमाणे परम पदी तो आकाशज आहे. कारणामुळे तो उत्पन्न होत नाही. म्हणूनच त्यास स्वयभव म्हणतात. तो पूर्वीही कर्ता नव्हता व आताही कर्ता नाही. तेव्हा त्याचे आक्रमण तू कसे करणार ? जेव्हा तो आपल्या बुद्धीने मरणाची कल्पना करील व पृथिव्यादि भूतयुक्त मी आहे, असे निश्चयाने समजेल, तेव्हा तो तझ्या तडाक्यात सापडेल, पण मी पृथ्व्यादि भूतरूप आहे, असे तो मानीतच नाही. त्यामुळेच तो रूपशून्य (निगकार ) आहे. तात्पर्य दोरीने आकाशास बाधता येणे जसे अशक्य आहे, तसेच त्याला मारणे अशक्य आहे, असे तू जाण. हे ऐकून मृत्यु ह्मणतो-भगवन् , विकाररहित शून्यापासून त्या ज- न्मरहित ( अज) द्विजाचा जन्म कसा झाला, ते मला साग. त्याच- प्रमाणे विद्यमान असलेल्या पृथिव्यादि भूतास तुम्ही असत् कसे ह्मणता ? ते मला समजले नाही. यम ह्मणतो-पर ब्रह्मास आकाश ह्मणून जे हटले आहे व पथिवी, आप इत्यादि भूतास असत् ह्मणून जे झटले आहे ते ती शून्य आहेत या अभिप्रायाने झटलेले नाही. तर कार्य- कारणाहून पृथक्सत्तायुक्त नसते, त्या दोघाची सत्ता एकच असते, अर्थात् कार्य व कारण याचे ऐक्य असते, या अभिप्रायाने झटले आहे. त्याचप्रमाणे जन्मरहिताचा जन्म, असे जे झटले आहे, ते विवर्ताच्या अभिप्रायाने झटले आहे. परिणामाच्या अभिप्रायाने झटलेले नाही. ह्मणजे अज आत्म्याचा जन्म झाल्यासारखा वाटतो. खरोखरी तो होत नाही. साराश, हा द्विज वस्तुतः कधी झाला नाही, व तो नाही असही नाही. तो सदा विज्ञान-प्रकाशरूप आहे. महा प्रलय झाला असता सृष्टीतील काही रहात नाही, पण शात, निर्गुण, अनत, केवल,