पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग २. १०५ कसें सपत नाही, असे म्हणून मृत्यु चिताकुल झाला. मी सर्व प्राण्यास व भूतमात्रास क्रमाने खाऊन टाकितो. मीच एक अक्षय आहे. पण या आकाशजास मी का भक्षण करू शकत नाही? काळ्या पाषाणावर जशी तरवारीची धारा कुंठित होते त्याप्रमाणे माझी सर्व शक्ति याच्यापुढे कुठित होते. तरी पण अजून प्रयत्न करून पहावा, असा विचार करून तो मेरूवरील त्याच्या गृहात गेला. कारण उद्योगी लोक आपला उद्यम कधीही सोडीत नाहीत. पण गृहामध्ये पाय ठेविताच भयकर अग्नि त्यास जाळू लागला. तरी सुद्धा मृत्यु भ्याला नाही. त्या शूराने अग्नीच्या ज्वालाचे निवारण क- रून गृहात प्रवेश केला. तेव्हां तो द्विज त्याच्या दृष्टी पडला व त्यास हा- ताने धरून न्यावे असाही त्याने सकल्प केला. पण पुढे बसलेल्या ब्राह्म- णास स्पर्श करण्याचे धैर्य त्यास होईना. तेव्हा खिन्न झालेला तो मृत्यु यमाकडे आला, व म्हणाला, "मी या आकाशज ब्राह्मणास भक्षण करण्यास का बरे समर्थ होत नाही?" हे ऐकून यम उलट बोलला-बा मृत्यो, तू एकटाच कोणालाही मारू शकत नाहीस. तर ज्याला मारावयाचे असते त्याच्या कर्माचे सहाय तुला अवश्य घ्यावे लागते. यास्तव त्या ब्राह्मणाची कमें तू हुडकून काढ. त्याच्या सहायाने तू त्यास खावू शकशील. यमाचे हे भाषण ऐकून मृत्यु त्याची कमें कोठे आहेत, याचा शोध करीत लहान-मोठी गावें, अरण्ये, पर्वत, नद्याचे व समुद्राचे तीर इत्यादि स्थळां- तून भटकू लागला. त्याने सर्व त्रिभुवन शोधले. पण त्यास आकाश- जाची कर्मे सापडली नाहीत. तेव्हा तो श्रात झालेला मृत्यु पुनः यमाकडे आला. कारण सेवकास कठिण प्रसगी स्वामीचाच आश्रय करावा लागतो. " महाराज, त्या ब्राह्मणाची कमें मला आढळत नाहीत. ती कोठे आहेत, ते आपणच कृपा करून सागा, " असा मृत्युने प्रश्न केला असता यम, पुष्कळ विचार करून म्हणाला--मृत्यो, केवळ आकाशापासून उत्पन्न झालेल्या त्या विप्राची कमेंच नाहीत. आकाशापासून झालेला तो शुद्ध आकाशच असणार, हे उघड आहे. त्यामुळे त्यास सहाय करणारी कोण- तीही कमें नसतात. वाझेच्या मुलाप्रमाणे त्याचा प्राक्तन कर्माशी थोडासाही सबध नसतो. तो कारणरहित आहे. त्यामुळेच तो आकाश होय. आकांशात मोठा वृक्ष असणे शक्य नाही. त्याचप्रमाणे त्याचे पूर्व कर्म अ- सणेही अशक्य आहे. पूर्व कर्माच्या आभावामुळेच त्याचे चित्त कर्मपरतत्र