पान:Yoga Vasishtha Part 01.djvu/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ बृहद्योगवासिष्ठसार. जणे चूक आहे. पदार्थामध्ये जसा रस असतो, तिलादिकाच्या ठायी जसे तेल असते व पुष्पामध्ये जसा सुगध असतो तशी द्रष्टयाचे ठायी दृश्यबुद्धि असते; ह्मणजे ती त्यास सोडून राहू शकत नाही. कापूर कोठेही जरी असला तरी त्याचा सुगध जसा चोहोकडे पसरतोच त्याप्रमाणे जेथे जेथे हा चैतन्यधातु, असतो तेथे तेथे दृश्य जग अनुभवास येतेच. अर्थात् वस्तु विद्यमान असल्यावर तिचे काये झाल्यावाचून रहात नाही. हृदयासारख्या अति सूक्ष्म प्रदेशातही मनोराज्य, स्वप्न, सकल्प इत्यादि विकाराचा उद्भव होतो व त्याचा प्राण्यास अनुभवही येतो. तेव्हां हृद- यातही दृश्यास अवकाश मिळतो, हे उघड आहे. ज्याप्रमाणे मन:कल्पित पिशाचे अज्ञास मारून टाकितात त्याप्रमाणे दृश्य वस्तु द्रष्टयाचा घात करितात. अकुर लहानशा बीजात असतो, पण अनुकूल देश व काल मिळेल तेव्हाच जसा तो मोठ्या वृक्षाकाराने परिणाम पावतो त्याप्रमाणे सर्व दृश्य हृदयामध्ये बीजरूपाने जरी असले तरी त्याचा एकाच वेळी अनुभव येत नाही. तर देश, काल, निमित्त इत्यादिकाचे जसे जसे आनुकूल्य होईल तसे तसे तें व्यक्त होते. साराश, बीजादि द्रव्यामध्ये जशी विचित्र कायें उत्पन्न करण्याची अतयं शक्ति असते त्याप्रमाणे चैतन्यरूप आत्मवस्तूच्या उदरातही असख्य चराचर जगै निमोण कर- ण्याची शक्ति आहे १. सर्ग २-देहच आत्मा आहे, असे समजणारा अज्ञ मृत्यूचे भक्ष्य होतो, तत्त्वज्ञ होत नाही, असें आकाशज ब्राह्मणाच्या आख्यायिकेने व्यक्त करितात. श्रीवसिष्ठ-( काम, कर्म व त्याची वासना याच्या योगाने पुष्ट झालेल्या अविद्यासज्ञक उपाधीने युक्त असलेला आत्मा जगाचे बीज आहे. आत्मविद्येच्या योगाने त्या बीजातील अविद्या-शक्तीस भाजून टाकिले असता प्राणी मृत्युवश होत नाही, असे वर सुचविलें आहे, पण त्याविषयींच काही विशेष सुचविण्याकरितां श्रीवसिष्ठ एक आख्या- यिका सागतात-) रामा, मी तुला आता आकाशजाचे रमणीय आख्यान सागतो, तें ऐक. त्यामुळे हे प्रकरण तुला चागले सम- जेल. आकाशज नामक कोणी एक द्विज होता; तो अति धार्मिक, केवल ध्याननिष्ठ व सतत प्राण्यांच्या हितामध्ये रत असे. ते पुष्कळ काल जीवंत राहिला. तेव्हां याचे आयुष्य अजून